आज दिवसभर राजकीय वर्तुळात एकच विषय चर्चेला होता तो म्हणजे आ. निलेश लंके यांचा शरद पवार गटात प्रवेश. सकाळपासून सर्वच मीडियातून निलेश लंके हे शरद पवार गटात जात हाती तुतारी घेत लोकसभेचे उमेदवार घोषित केले जातील अशा स्वरूपाच्या चर्चा रंगलेल्या होत्या. परंतु आज शरद पवारांच्या हाताने मी पाहिलेला कोविड या पुस्तकाचे प्रकाशन करत पत्रकार परिषद देखील घेतली.
परंतु त्यांनी पक्षप्रवेश मात्र केला नाही. त्यामुळे सर्वांचा भ्रमनिरास झाला व संभ्रम आणखीनच वाढला. एकंदरीतच पत्रकार परिषदेमधील सर्व भाष्य आपण जर पाहिले तर मात्र आ. लंके हे शरद पवार गटासोबतच आहेत फक्त औपाचारिकता बाकी आहे असेच दिसून आले.
पण मग आज आ. निलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश का केला नाही? त्यांना लोकसभेचा उमेदवार का घोषित केले गेले नाही? असे अनेक प्रश्न पडले. याचे काही कारणे आपण याठिकाणी पाहुयात…
१) तांत्रिक अडथळे व शरद पवारांचा चाणाक्षपणा
पक्षातील प्रवेश न करण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे तांत्रिक अडथळे. जर आज आ. निलेश लंके यांनी पक्षात प्रवेश केला असता तर पक्षांतर बंदी कायद्यांवये त्यांच्यावर कारवाई झाली असती. सहा वर्षांपर्यंत त्यांचे निलंबन झाले असते. त्यांना आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा लागले, राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल व त्यानंतर पक्षातील प्रवेश कारवाई लागेल. हीच गोष्ट लक्षात घेता, शरद पवार साहेबांनी त्यांचा आज पक्षातील प्रवेश केला नसावा अशी चर्चा आहे.
२) राणी लंके यांना तिकीट?
आ.निलेश लंके यांनी पक्ष प्रवेश करण्याचे टाळले याचे कारण म्हणजे राणी लंके यांना खासदारकीचा उभे करण्याचे त्यांचे नियोजन असावे असाही एक सूर आहे. निलेश लंके हे अजित पवारांची साथ कधीही सोडू शकत नाहीत असे म्हटले जाते. त्यामुळे याला पर्याय म्हणून राणी लंके यांना उमेदवारी ते देऊ शकतात. त्यांचा शरद पवार गटात प्रवेश होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
३) मीडियात राहण्याची राजकीय खेळी
शरद पवार असो की निलेश लंके असोत कॅमेरा आपल्या भोवती असावा, राज्याच्या राजकारणात, मीडियातून सदैव चर्चेत असावे अशीही एक खेळी यांची आजवर असलेली दिसते असे राजकीय तज्ञ सांगतात. त्यामुळे मीडियातून, चर्चेत केवळ आपलाच विषय असावा, आपल्याच भोवती मीडिया राहावी व लोकांच्या चर्चेचा विषय आपलाच असावा अशीही एक खेळी आजच्या संभ्रमामागे असू शकते असे म्हटले जात आहे.
४) अजित पवारांशी कालची चर्चा व आजचा त्यांचा सूचक इशारा
काळ बराच वेळ अजित पवार व आ. लंके यांची चर्चा झाली होती. त्यावेळी हाच विषय प्रामुख्याने चर्चेचा असावा असे म्हटले जाते. त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार यांनी मी निलेश लंके याना समजून सांगितले आहे, तो पारनेरपुरता फक्त प्रसिद्ध आहे, तसेच त्याला राष्ट्रवादीचा आधी राजीनामा द्यावा लागेल असा सूचक इशाराही दिला होता. त्यामुळे आ. लंके यांनी अचानक पक्षप्रवेशचा निर्णय लांबणीवर टाकला असावा अशी चर्चा आहे