राजकारण

Ahmednagar Politics : शंकरराव गडाख यांना का टार्गेट केलं जातंय? त्यांच्याविरोधात ‘राजकीय खेळी’ का सुरु आहेत? पहा..

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील काही मोजके राजकीय नेते असे आहेत की त्यांची एक विशिष्ट पद्धतीची नाळ आपल्या मतदार संघातील सर्वसामान्यांशी जोडली गेली आहे.

हे नेते व्यक्तिगत आयुष्यात किंवा राजकीय आयुष्यात कसे आहेत किंवा इतर काही गोष्टीशी या नागरिकांना काही घेणेदेणे नसते. यापैकीच एक म्हणजे गडाख. गडाख हे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात आपले वर्चस्व ठेऊन आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात ज्येष्ठ नेते यंशवंतराव गडाख यांची अनोखी छाप होती. आता आमदार शंकरराव गडाख यांची देखील नाळ जुळलेली आहे. ते आमदार झाल्यानंतर महाविकास आघाडीत गेले. उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची जवळीक आली.

त्यांना मंत्रिपद दिल गेलं. पण महायुती सरकार आलं व गडाखांचं मंत्रिपद गेलं. परंतु यानंतर त्यांच्यावर काही प्रमाणात राजकीय कुरघोड्या करण्याचा प्रयत्न सुरु झाला अशी चर्चा नागरिक करत आहेत.

आता यावर स्वतः आ. शंकरराव गडाख यांनी भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्यानेच आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचे गडाख यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले शंकरराव गडाख?

भाजप-महायुती सरकारकडून आपल्याला टार्गेट केलं जात आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्यानेच जाणीवपूर्वक निधी वाटपात टाळले गेले आहे. राज्य सरकारकडून निधी वाटपात अन्याय केला गेला असून

नेवासा तालुक्याला निधी देण्यास टाळले गेले असल्याचा आरोप आ. शंकरराव गडाख यांनी केला आहे.

 समन्यायी पाणी वाटप कायद्यावर आक्रमक भूमिका

नेवासे तालुक्यातील पाचेगांव आणि परिसराला वरदान ठरणाऱ्या बंधाऱ्यातील पाण्याचे जलपूजन आमदार शंकरराव गडाख आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले. या वेळी आ. गडाख यांनी वरील वक्तव्य केले.

यावेळी त्यांनी समन्यायी पाणी वाटप कायद्यावर पुन्हा भाष्य केले. गडाख म्हणाले, पाचेगाव आणि पुनतगाव परिसरातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी रस्त्यावर उतरून मोठा संघर्ष करण्याची तयारी असून नगर जिल्ह्याला समन्यायी पाणी वाटप कायदा हे ग्रहण आहे.

आपल्यावर अन्याय करणारा हा कायदा असल्याने यात बदल व्हावा यासाठी आपण सामूहीक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

यावेळी ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे म्हणाले की, समन्यायी पाणी वाटप कायद्यातील पाण्याचे पुन्हा फेरनियोजन होणे गरजेचे झाले आहे. हे फेरनियोजन न झाल्यास नगरच्या शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागले. यासाठी न्यायालयीन आणि रस्त्यावरचा संघर्ष करण्याची आपली तयारी असल्याचे ते म्हणाले.

Ahmednagarlive24 Office