मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यावरून चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका आणि रोपसत्र सुरु आहे. भाजप (BJP) नेते प्रवीण दरेकरांनी (Praveen Darekar) शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर खोचक टीका केली आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले, संजय राऊत हे बाळासाहेबांचे काम विसरले आहेत. अल्टीमेटम (Ultimatum) हा बाळासाहेबांकडून दिला जात होता.

मात्र आता संजय राऊत नुसतेच बोलतात. सजंय राऊत कोण आहेत, त्यांचा जीव किती ते बोलतात किती अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

प्रवीण दरेकर यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भूमिका चांगली असल्याचे म्हंटले आहे, राज ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. राज ठाकरे सर्व गोष्टी शांततेत करत आहेत.

राज ठाकरे यांनी आज एक पाऊल मागे घेतले आहे. याचा आर्थ त्यांनी माघार घेतली असा होत नाही. त्यांनी चार पाऊले पुढे जाण्यासाठी एक पाऊल मागे घेतल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.

प्रवीण दरेकरांनी शरद पवारांविषयीही (Sharad Pawar) भाष्य केले आहे. पवारांचे योगदान नाकारता येणार नाही, मात्र राज्याचा सात बारा काय एकट्या शरद पवारांच्याच नावावर आहे का?

बाकी कोणीच नाहीये का?, मग शरद पवार यांचा अपमान म्हणजे संपूर्ण राज्याचा अपमान कसा होऊ शकतो असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.