file photo

अहमदनगर Live24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील हिवरे बाजार येथील पोपटराव पवार यांना आज सोमवारी (दि.८)देशाची राजधानी दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

देशातील बहुचर्चित पद्म पुरस्कार वितरण सोहळा आज राजधानी दिल्लीत पार पडला. यंदा सात मान्यवरांचा ‘पद्म विभूषण’, १० मान्यवरांचा ‘पद्मभूषण’ आणि १०२ जणांचा ‘पद्मश्री’ पुरस्कारासहीत गौरव करण्यात आला आहे.

तर १६ जणांना मरणोत्तर ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात आदर्श ग्राम चे आदर्श सरपंच , राज्य आदर्श ग्राम समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

पवार यांच्या या गौरवमुळे नगर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण पार पडलं.

देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार ‘पद्म विभूषण’ प्राप्त मान्यवरांत दीर्घकाळापर्यंत जपानचं पंतप्रधान पद भूषणवणारे शिंजो आबे यांचाही समावेश आहे.

पार्श्वगायक एस पी बालासुब्रमण्यम (मरणोत्त) यांना पद्म विभूषण तर आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई (मरणोत्तर), माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (मरणोत्तर), आणि माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांना ‘पद्वभूषण’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.