file photo

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2022 Price of LPG cylinder : सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. तेल कंपन्यांनी घरगुती गॅस (14.2 किलो) सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ केली आहे.

आता घरगुती सिलिंडरची किंमत 999.50 रुपये प्रति सिलिंडर असेल. याआधी मार्च 2022 मध्ये घरगुती सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

या महिन्याच्या 1 तारखेला तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमतीत 102.50 रुपयांनी वाढ केली होती. 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या या किमती वाढवण्यात आल्या आहेत. किमतीत वाढ झाल्यानंतर या निळ्या सिलेंडरची नवी किंमत आता दिल्लीत 2355.50 रुपये झाली आहे.

यापूर्वी त्याची किंमत 2253 रुपये होती. त्याच वेळी, 5 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत सध्या 655 रुपये आहे. महिनाभरापूर्वी 1 एप्रिल रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 250 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

यापूर्वी 1 मार्च रोजी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 105 रुपयांनी, तर 22 मार्चला 9 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

महागाई थांबेल का? पेट्रोल-डिझेलचे भाव, स्वयंपाकाच्या गॅसचे दर आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती यामुळे जनतेच्या खिशावर सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आता तुमचे कर्जही महागणार आहे,

कारण RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी ही वाढ करण्यात आल्याचा तर्क आहे. आता प्रश्न असा आहे की महागाई कर्जाने थांबणार का? गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.