file photo

अहमदनगर Live24 टीम, 04 नोव्हेंबर 2021 :-  कोरोना विषाणूपासून जनतेचे रक्षण करण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

मंगळवारपर्यंत भारतात 107 कोटीहून अधिक कोरोना लसीचे डोस देण्यात आले असतानाच विदेश दौऱ्यावरून परतताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लसीकरणाचा आढावा घेतला.

त्यांनी 40 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही उपस्थित होते.

देशातील 40 जिल्ह्यांत 50% पेक्षा कमी लसीकरण झाले असल्यावरून मोदींनी संतापही व्यक्त केला. गाव, खेड्यासाठी वेगळी रणनीती तयार करा पण लसीकरण वाढविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करा, अशा कडक सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

लसीकरण मोहीमेत आरोग्य कर्मचारी आणि आशा कार्यर्कत्यांनी मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी दुर्गम भागांमध्ये जाऊन नागरिकांचे लसीकरण केले आहे, असे कौतुकही पंतप्रधानांनी केले.

लसीकरण मोहीमेत आपण आतापर्यंत जी काही प्रगती केली आहे, त्याचं यश प्रशासन आणि आशा वर्कर्सना आहे. एक डोस देण्यासाठी त्यांनी कित्येक मैल प्रवास केला आहे.

अतिशय दुर्गम भागात पोहोचले आहेत. पण कोरोनावरील लसीकरण मोहीमेत आपण 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडल्यानंतर संथ झालो तर नवीन आव्हान समोर उभे ठाकतील, असा इशारा पंतप्रधान मोदींनी यावेळी दिला.