अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- निळवंडे कालव्यांसाठी भूपसंपादनास लागणारा विलंब लक्षात घेवून काही भागात बंदीस्त पाईपलाईनच्या माध्यमातून काम करण्याचे धोरण जलसंपदा विभागाने घ्यावे आशी आग्रही मागणी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.(MLA Radhakrishna Vikhe)

हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्‍या दिवशी प्रश्नोतराच्या तासात जलसंपदा विभागाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या चर्चेत सहभाग घेताना आ.विखे पाटील यांनी निळवंडे कालव्यांच्या कामाकडे मंत्री जयंत पाटील यांचे लक्ष वेधले.

आ.विखे पाटील म्हणाले की मुळातच भूसंपादनास होणारा विलंब काही भागात शेतकऱ्यांचा भूसंपादनास होणारा विरोध आणि कालव्‍यांच्‍या कामासाठी होत असलेला विलंब लक्षात घेवून आशा भागात जलसंपदा विभागाने बंदीस्त पाईपलाईनद्वारे काम पूर्ण करण्याबाबतचे धोरण घ्‍यावे अशी भूमिका मांडली.

कालव्‍यांच्‍या कामांना उशिर होत असल्‍याने लाभक्षेत्रात निळवंडे धरणाचे पाणी पोहोचण्‍यासही मोठा कालावधी लागेल. ही बाब त्‍यांनी मंत्र्यांच्‍या निदर्शनास आणून दिली.

मंत्री जयंत पाटील यांनी याबाबत बोलताना निळवंडे कालव्यांच्या कामासाठी भूसंपादन पूर्ण होत असून शेतकऱ्यांना त्याचा मोबदला दिला गेला आहे.

कालव्यांची कामही पूर्णत्वास जात असून डिसेंबर २०२३ पर्यत लाभक्षेत्रात पाणी देण्याची ग्वाही मंत्री जयंत पाटील यांनी आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांना दिली.