अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- येथील सेवा निवृत्त जिल्हा विशेष समाजकल्याण अधिकारी रफीक मुन्शी यांनी जिल्ह्यात कर्तत्व दक्ष अधिकारी म्हणून चांगले काम केले आहे.

सेवानिवृत्ती नंतर आजही त्यांचे समाजकार्य हे तरुणांना लाजवेल अशा पध्दतीने दिवस-रात्र सुरु आहे. समाजासाठी झटणारे, गोरगरीबांसाठी विविध संघटनांच्या माध्यमातून मदत मिळवून देण्याबरोबरच अनेक धार्मिक स्थळे,

कब्रस्थान (स्मशानभूमी), मस्जिद, दर्गा आदिंसाठी शासनाच्या विविध खात्यांचा निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करून विशेष प्रयत्न करत आहेत.

मिरावली पहाड दर्गा परिसराच्या विकासासाठी शासन दरबारी झटणारे, अनेक भागात वृक्षारोपण करणे त्याचे संगोपन करणे अशा अनेक सामाजिक कार्यात मनापासून प्रयत्न करत आहेत.

रोटरी क्लबच्या माध्यमातून कोरोना संकट समयी कोविड सेंटरच्या रुपाने गोरगरीबांना मा. रफीक मुन्शी यांच्या प्रयत्नातून मोठी मदत लाभली. अशा सर्व समाजाच्या, पक्षाच्या, नेते मंडळी, नागरिक यांच्या बरोबर प्रेमाचे संबंध असलेले, स्पष्ट वक्ते म्हणून ख्याती असलेले,

विशेष म्हणजे संपूर्ण नोकरीत असताना व निवृत्ती नंतर ही कुठलीही आर्थिक लाभाची अपेक्षा न करणार्‍या रफीक मुन्शी यांना विधान परिषदेवर निवड करुन जनतेच्या सेवेची संधी महाविकास आघाडी तसेच भाजपच्या नेत्यांनी द्यावी, अशी मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे भाजप अल्पसंख्याक आघाडी चे शहर जिल्हा प्रमुख हाजी अन्वर खान पत्रकार यांनी केली आहे.

या निवेदनाच्या प्रती मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उप मुख्यमंत्री नाम. अजित पवार, काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषद वि.पक्षनेते प्रविण दरेकर,

आदींना ई-मेल व्दारे पाठवल्या आहेत. गेल्या 30-32 वर्षांपुर्वी माजी मंत्री एस.एम.आय.आसिर यांच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात मुस्लिम समाजाला संधी मिळालेली नाही,

तेव्हा सर्वच बाबतीत सक्षम असणारे रफिक मुन्शी यांना विधान परिषदेवर घेऊन मुस्लिम समाजाला प्रतिनिधीत्व द्यावे, अशी समस्त मुस्लिम समाजाची मागणी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.