file photo

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- आमदार नीलेश लंके यांच्या कामाचा डंका सातासमुद्रापार वाजत आहे. त्यांनी कोविडमध्ये जे काम केले ते न भूतो ना भविष्यती होते. लोकसंपर्क असलेला नेता म्हणून नीलेश लंके यांची ओळख निर्माण झाली आहे.

लोकसंपर्क असलेला नेता म्हणून नीलेश लंके यांच्याकडे पाहिले जात आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात विधान परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, स्थानिक स्वराज्य संस्था आदींच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी पाटील दोन दिवस अहमदनगर जिल्ह्यात आले आहेत.

या यात्रे निमित्त जयंत पाटील यांनी आज अहमदनगर शहर, पारनेर व श्रीगोंदे येथे पक्ष बांधणी कामाच्या पाहणीसाठी आढावा बैठका घेतल्या.

पारनेरमधील आढावा बैठकीला आमदार नीलेश लंके, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यासह मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, आज तरूण पिढीचा पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला असून तरुण पिढी पक्षाच्या पाठिशी उभी रहात आहे.

राळेगणसिद्धी हा परिसर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नावाने ओळखला जातो आता तो नीलेश लंके यांच्या नावाने ओळखला जाईल.

पूर्वी चार आणे वाढले तरी आंदोलन व्हायचे मात्र महागाई दरवाढ होऊनही यावर कोण आंदोलन करत नाही. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.