अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Ahmednagar News :- रविवारी सायंकाळी चंद्रदर्शन न झाल्याने मुस्लिम बांधवांची रमजान रमजान ईद मंगळवारी (३ मे) साजरी होणार आहे.

हिलाल सिरत कमिटीच्या रात्री झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आज सोमवारी महिन्याचा शेवटचा तिसावा उपवास (रोजा) करण्यात येणार आहे

रविवारी चंद्रदर्शन होईल अशी मुस्लिम बांधवांना अपेक्षा होती मात्र अहमदनगरसह देशात कोठेही चंद्र दर्शन झाले नाही. त्यामुळे ठिकठिकाणीच्या हिलाल समित्यांनी ईद मंगळवारी करण्याचा निर्णय जाहीर केला.

उष्णतेची लाट आणि प्रचंड उकाड्याच्या काळात मुस्लिमांनी महिनाभर उपवास ठेवले आहेत. दरम्यान अहमदनगर शहरात ईदगाम मैदानावर मंगळवारी सकाळी सामुदायिक नमाज पठण होणार आहे. त्यासाठी मैदानावर तयार सुरू करण्यात आली आहे.