Ration Card : जर तुम्हीही शिधापत्रिकाधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. कारण सरकार (Government) आता नियमात बदल करत असून नवीन नियम (Rules) बनवत आहे.

याचा फायदा लोकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान, सरकारने रेशन ग्राहकांना (customers) डिजिटल शिधापत्रिका (Digital ration card) देण्याचा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला रेशन घेण्यासाठी डिजिटल कार्ड दाखवावे लागेल, ज्यावरून तुम्ही गहू-तांदूळाचा (wheat-rice) लाभ घेऊ शकाल.

आतापर्यंत १२ लाखांहून अधिक लोकांना डिजिटल शिधापत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत. उत्तराखंड सरकार आपल्या राज्यातील लोकांसाठी डिजिटल शिधापत्रिका वितरित करत आहे.

आदल्या दिवशी भाजप आमदार प्रीतम सिंह पनवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अन्नमंत्री रेखा आर्य यांनी सांगितले की, डिजिटल कार्ड प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. कोरोनामुळे या कामाला विलंब झाला होता, मात्र आता या वर्षी जुलै अखेरपर्यंत सर्व ग्राहकांना डिजिटल शिधापत्रिका देण्यात येणार आहेत.

आतापर्यंत अनेक डिजिटल कार्डचे वाटप झाले आहे

रेखा आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मे पर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये १३ लाख ४६ हजार ६३२ नवीन शिधापत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 12 लाख 58 हजार 544 शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यात आले आहे.

आर्थिक सर्वेक्षणाशिवाय रेशनकार्ड सरेंडर (Ration card surrender) करण्याच्या प्रश्नावर रेखा आर्य म्हणाल्या की, या कामासाठी आर्थिक पाहणी अहवालाची गरज नाही. जुलै २०१३ मध्ये जारी करण्यात आलेल्या शिधापत्रिका बनविण्याच्या निकषानुसार नियमाविरुद्ध बनविलेल्या शिधापत्रिकाच सरेंडर केल्या जात आहेत.