Ration Card : देशातील करोडो रेशन कार्डधारकांसाठी (Ration card holders) एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण आता देशातील रेशन कार्डधारकांना सप्टेंबरनंतरही मोफत रेशन (Free Ration) मिळणार आहे.

याबाबत अन्न सचिव सुधांशू पांडे (Sudhanshu Pandey) यांनी माहिती दिली आहे. असे झाल्यास कोट्यावधी रेशन(Ration) कार्डधारकांना फायदा होणार आहे.

काय आहे पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना?

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना मोदी सरकारने (Modi Govt) मार्चमध्ये सुरू केली होती. साथीच्या आजारामुळे लॉकडाऊन दरम्यान 80 कोटी लोकांना मोफत अन्न देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती.

सरकारने या योजनेला अनेकवेळा मुदतवाढ दिली, यापूर्वी ही योजना 31 मार्च 2022 पर्यंत होती, त्यानंतर ती सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. हा निर्णय झाल्यास 80 कोटी जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.

अंदाजे खर्च 3.40 लाख कोटी

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत, 80 कोटींहून अधिक लोकांना 5 किलो तांदूळ किंवा गहू, 1 किलो हरभरा मोफत दिला जातो. हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत अनुदानित शिधाव्यतिरिक्त आहे.

रोलर फ्लोर मिलर्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (Roller Floor Millers Federation of India) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी सुधांशू पांडे म्हणाले, “सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल.”

सरकारने मार्चपर्यंत या योजनेवर सुमारे 2.60 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत आणि सप्टेंबरपर्यंत 80,000 कोटी रुपये खर्च केले जातील, PMGKA अंतर्गत एकूण खर्च सुमारे 3.40 लाख कोटी रुपयांवर नेला जाईल.