Type Of Property:- मालमत्ता म्हणजेच प्रॉपर्टी ही संकल्पना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची असून व्यक्ती एखादा व्यवसाय किंवा नोकरी करत असतो व त्या माध्यमातून पैसा कमावून कुठेतरी प्रॉपर्टी खरेदी करत असतो. जीवनामध्ये प्रॉपर्टीला खूप महत्त्व दिले जाते व ते महत्त्वाचे देखील आहे.
आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून प्रॉपर्टी किंवा मालमत्ता असणे हे तितकेच गरजेचे असते. प्रॉपर्टी ही संकल्पना आर्थिक दृष्टिकोनातून म्हणजेच पैशांशी संबंधित असल्यामुळे अनेकदा मोठ्या प्रमाणावर या संबंधी वाद देखील उद्भवतात. कधी कधी अशा प्रकारचे वाद कोर्टाच्या दारात देखील पोहोचतात.
अशाप्रकारे प्रॉपर्टी ही संकल्पना बऱ्याच वादांना देखील कारणीभूत ठरू शकते व त्यामुळे प्रॉपर्टीच्या बाबतीत अनेक प्रकारचे कायदे भारतात आहेत. परंतु बऱ्याचदा कायदेशीर बाबी अनेकजणांना माहीत नसल्यामुळे देखील प्रॉपर्टीच्या बाबतीत अनेक संभ्रम किंवा गोंधळ असतात.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे प्रॉपर्टीचे देखील प्रकार असतात व त्यातील प्रमुख प्रकार जर बघितले तर ते म्हणजे एक स्थावर प्रॉपर्टी आणि दुसरी म्हणजे जंगम प्रॉपर्टी होय.
आता हे प्रकार बऱ्याच जणांना माहिती आहेत व कित्येक जणांना अजून देखील यामध्ये फरक करताना गोंधळ उडतो. त्यामुळे या दोन्ही प्रकारांमध्ये नेमका काय फरक आहे याची माहिती थोडक्यात आपण या लेखात बघू.
स्थावर मालमत्ता म्हणजे नेमके काय?
प्रॉपर्टीचा हा प्रकार अतिशय महत्त्वाचा असून या प्रकारामध्ये अशा प्रॉपर्टीचा समावेश होतो की जी प्रॉपर्टी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येत नाही अशा प्रॉपर्टीला स्थावर प्रॉपर्टी किंवा स्थावर मालमत्ता म्हटले जाते. साहजिकच यामध्ये तुम्ही तुमचे घर असेल किंवा जमीन असेल किंवा दुकान असेल यांचा समावेश होऊ शकतो.
जर आपण सामान्य कलम कायदा 1897 कलम 3(26) नुसार बघितले तर स्थावर मालमत्तेत जमीन आणि इतर गोष्टींचा समावेश असतो व ज्याचा जमिनीशी कायमस्वरूपी संबंध असतो. या प्रकारच्या प्रॉपर्टीमध्ये अनेक कायदेशीर नियम लागू होतात व या मालमत्तेवर कर सुद्धा भरावा लागतो.
जंगम मालमत्ता किंवा जंगम प्रॉपर्टी म्हणजे नेमके काय?
प्रॉपर्टीच्या या प्रकारामध्ये अशा प्रॉपर्टीचा किंवा अशा मालमत्तेचा समावेश होतो जी सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला नेता येते किंवा हलवता येते.यामध्ये तुमचे वाहन असेल किंवा दागिने असतील अशा अनेक प्रकारच्या प्रॉपर्टीचा समावेश होतो.
जर आपण जंगम प्रॉपर्टीच्या बाबतीत बघितले तर नोंदणी अधिनियम,1908 च्या कलम 2(9) नुसार या प्रकारच्या प्रॉपर्टीमध्ये पिके तसेच गवत व फळे तसेच लाकूड इत्यादी गोष्टींचा सुद्धा समावेश करता येतो.
दोन्ही प्रॉपर्टीमधील महत्त्वाचा फरक
या दोन्ही प्रकारच्या मालमत्तेमधील जर फरक बघितले तर यामध्ये जंगम प्रॉपर्टी करिता तुम्हाला नोंदणी करण्याची गरज राहत नाही. परंतु या उलट स्थावर मालमत्तेची किंमत जर शंभर रुपयांपेक्षा जास्त असेल तर नोंदणी कायदा 1908 अंतर्गत या मालमत्तेची नोंदणी करणे गरजेचे असते.
तसेच जंगम मालमत्ता तुम्ही सहजपणे कुणाला पण भेट म्हणून देऊ शकतात. परंतु याउलट स्थावर मालमत्तेच्या बाबतीत बघितले तर अशा प्रकारची प्रॉपर्टी ही तुम्ही मृत्युपत्र किंवा इतर तरतुदी तसेच कायदेशीर विभाजन केल्याशिवाय दुसऱ्याला देऊ शकत नाहीत.
शिवाय कायदेशीर मार्ग शिवाय ही प्रॉपर्टी कोणाच्याही मालकीचे होऊ शकत नाही. म्हणजेच या प्रॉपर्टीची विभागणी किंवा वाटणी ही कायदेशीर मार्गानेच किंवा कायदेशीर तरतुदीद्वारेच केली जाऊ शकते. म्हणजे जंगम प्रॉपर्टी प्रमाणे सहजपणे कोणाला ती भेट म्हणून देता येत नाही.