रिअल इस्टेट

एखादी मालमत्ता खरेदी-विक्रीवर देखील सेवाकर आकारला जातो? कुठल्या मालमत्तेवर भरावा लागतो सेवाकर? जाणून घ्या काय आहेत यामागील नियम?

Published by
Ajay Patil

Service Tax On Property:- मालमत्तेची खरेदी विक्री व्यवहार हे मोठ्या प्रमाणावर होतात व अशा प्रकारचे व्यवहार हे अनेक प्रकारच्या कायद्याच्या नियमांमध्ये किंवा चौकटीत राहून करणे गरजेचे असते. कारण तुम्ही घर घेतले किंवा जमीन घेतली तरी या अशा प्रकारच्या मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करावा लागतो व या उद्देशाने तुम्ही अशा व्यवहारांमध्ये महत्त्वाचे असलेले नियम माहित करून घेणे किंवा तुम्हाला ते माहीत असणे खूप गरजेचे असते.

नाहीतर विनाकारणच पैसा तर जातोच परंतु नंतर खूप मोठ्या प्रमाणावर मानसिक पश्चाताप करण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. त्यामुळे मालमत्ते संदर्भातील कायदे किंवा नियम तसेच त्यावर आकारले जाणारे टॅक्स इत्यादी गोष्टींची माहिती अगोदरच आपल्याला असणे फायद्याचे ठरते.

अगदी याच पद्धतीने जर आपण बघितले तर टॅक्स म्हणजेच कराबद्दल आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत व त्यामधील सर्विस टॅक्स म्हणजे सेवा कर देखील आपल्याला माहिती आहे. सेवा कर म्हणजे एखाद्या व्यवसायाच्या माध्यमातून ज्या काही सेवा देण्यात येतात त्या सेवांवर हा कर आकारला जातो.

परंतु या व्यतिरिक्त मालमत्तांवर देखील तुम्हाला सेवा कर भरावा लागतो. परंतु कोणत्या प्रकारच्या मालमत्तेवर तुम्हाला सेवा अर्थात सर्विस टॅक्स लागतो हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे.

कोणत्या प्रकारच्या मालमत्तेच्या किंवा घराच्या व्यवहारावर सेवा कर द्यावा लागतो?
मालमत्तेवर आकारण्यात येणाऱ्या सेवा करा बद्दल बघितले तर प्रामुख्याने रियल इस्टेट क्षेत्रामध्ये मालमत्तेचे बांधकाम सुरू आहे म्हणजेच बांधकामाधीन मालमत्तेवर सेवा कर आकारला जातो. म्हणजे विक्रीसाठी देऊ केलेली कुठलीही मालमत्ता किंवा बिल्डिंग कॉम्प्लेक्स किंवा सिविल स्ट्रक्चर असेल तर त्यावर तुम्हाला सेवा कर शुल्क आकारले जाते.

त्यामुळे घराची खरेदी करताना मालमत्ताधारकांना अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये मालमत्तेची जेव्हा खरेदी होते तेव्हा त्या मालमत्तेची मालकी बदलते.म्हणजे मालकी हक्क एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित होतो.

अशाप्रकारे जो विक्रेता म्हणजेच मालमत्ता विकणारा असतो तो त्या मालमत्तेचा सेवा प्रदाता बनतो व त्यावर सेवा कर त्याला भरावा लागतो. परंतु यामध्ये सक्षम अधिकाऱ्यांनी पूर्णत्व प्रमाणपत्र जारी करण्यापूर्वी हा कर भरावा लागतो.

मालमत्ता या दोन प्रकारच्या असतात व यातील पहिला प्रकार म्हणजे बांधकाम सुरू असलेली म्हणजेच बांधकामाधिन मालमत्ता व रेडी टू मुव्ह म्हणजेच विकण्यास तयार असलेली मालमत्ता असे दोन प्रकार पडतात.

परंतु रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये सर्विस टॅक्स म्हणजे सेवा कर हा केवळ बांधकाम सुरू असलेल्या मालमत्तेवरच आकारला जातो. एखादा बिल्डर किंवा रिअल इस्टेट डेव्हलपर जेव्हा इमारत संकुल किंवा सिव्हिल स्ट्रक्चर किंवा भाग विक्रीकरिता ऑफर करतो तेव्हा बांधकामाधीन मालमत्तेवर सेवा कर आकारला जातो.

परंतु जी मालमत्ता बांधून तयार असेल अशा मालमत्तेवर कुठल्याही प्रकारचा सेवा कर मात्र भरावा लागत नाही. मागील प्रमुख कारण म्हणजे संबंधित मालमत्ता विकासक असे मालमत्तेची विक्री करत आहे जी पूर्णपणे तयार आहे. म्हणजे बिल्डर किंवा विकासक म्हणजेच डेव्हलपर मालमत्तेच्या खरेदीदाराला कोणतीही सेवा देत नाही.

तसेच अशाप्रकारे प्रॉपर्टीचे व्यवहारांमध्ये कर भरावा लागतो. परंतु यामध्ये अनेक मालमत्तेचे व्यवहार उच्च कर आकर्षित करतात आणि करदात्यांना कर बचतीच्या संधी देखील देतात.

त्यामुळे कोणती मालमत्ता खरेदी किंवा विक्री करायची असेल त्या अगोदर व्यावसायिकाकडून कर सल्ला घेणे कधीही फायद्याचे ठरते. तसेच मालमत्तेवरील सेवा कराच्या संदर्भात देखील सवलत दिली जाते. परंतु ती काही विशिष्ट प्रकरणांमध्ये उपलब्ध आहे..

सेवा कर भरण्याकरिता कुठली कागदपत्रे लागतात?
सेवा कर भरण्याकरिता प्रामुख्याने संबंधित प्रॉपर्टीचा संपूर्ण तपशील तसेच प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्याचे म्हणजेच खरेदीदाराचे पॅन कार्ड संबंधित प्रॉपर्टी डेव्हलपर म्हणजेच मालमत्ता विकासकाचा सेवा कर नोंदणी क्रमांक असणे गरजेचे आहे.

मालमत्तेवर आकारल्या जाणाऱ्या सेवा कराचा दर काय?
जर आपण मालमत्तेवर आकारण्यात येणाऱ्या सेवा कराचा दर पाहिला तर तो प्रामुख्याने 3.75% किंवा 4.5% पर्यंत आहे. हा दर प्रामुख्याने संबंधित मालमत्तेचा आकार आणि व्यवहाराचे मूल्य म्हणजेच व्हॅल्युएशन किती आहे यावर प्रामुख्याने अवलंबून असतो. सेवा कर मार्च महिन्यात कॅलेंडर वर्षात 31 मार्च पर्यंत केंद्र सरकारला भरावा लागतो.

Ajay Patil