तुम्हाला जर जमीन किंवा एखाद्या मालमत्तेमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर पैसे लागतात व प्रत्येकालाच इतकी मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची गुंतवणूक करणे शक्य होत नाही व इच्छा असून देखील बरेच जण रिअल इस्टेट म्हणजेच मालमत्ता किंवा प्रॉपर्टी इत्यादीमध्ये गुंतवणूक करायला असमर्थ ठरतात.
म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक आवाक्याबाहेर इस्टेट क्षेत्रातली गुंतवणूक आहे. परंतु जर तुम्हाला रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची असेल तर ती तुम्ही रियल इस्टेट इन्वेस्टमेंट ट्रस्ट म्हणजेच रिटच्या माध्यमातून अवघ्या १४० रुपयांमध्ये करू शकतात
व या माध्यमातून तुम्ही देशातील एका मोठे व्यावसायिक केंद्रात किंवा ऑफिसमध्ये देखील गुंतवणूक करू शकतात. त्यामध्ये तुम्ही जितकी रक्कम गुंतवाल ते भाडे तुम्हाला दर तीन महिन्यांनी त्या प्रॉपर्टीच्या माध्यमातून देण्यात येते.
रिट देते तुम्हाला रियल इस्टेट क्षेत्रात 140 रुपयांमध्ये गुंतवणुकीची संधी
रिटच्या माध्यमातून तुम्ही 140 रुपयांमध्ये देशातील कुठल्याही मोठे व्यवसाय केंद्रात किंवा ऑफिसमध्ये गुंतवणूक करू शकतात व या माध्यमातून तुम्ही जी रक्कम गुंतवाल त्यानुसार दर तीन महिन्यांनी भाडे स्वरूपात तुम्हाला पैसे कमावता येतात.
रियल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्हणजेच रिट रिअल इस्टेट मधील गुंतवणुकीचा अतिशय सोपा मार्ग आहे. रिट हे असे माध्यम आहे की या माध्यमातून तुम्हाला एखाद्या मोठ्या प्रकल्पामध्ये किंवा व्यवसाय केंद्रात गुंतवणूक करायचे असेल तर त्याकरिता कोटी रुपये खर्च करण्याची गरज नाही.
व्यावसायिक केंद्रांमध्ये तुम्ही रिटच्या अप्रत्यक्षपणे अशा व्यावसायिक केंद्रांमध्ये गुंतवणूक करू शकतात व अशा मालमत्तेत युनिट होल्डर देखील बनु शकतात.रिटचे एक युनिट 140 रुपये ते 385 रुपयांमध्ये खरेदी करता येतो.
कसे आहे नेमके रिटचे स्वरूप?
हे एक मॅच्युअल फंड कंपनी सारखे असून मॅच्युअल फंडामध्ये जसा फंड मॅनेजर तुमचे पैसे चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवतो व तुम्हाला परतावा देतो अगदी त्याचप्रमाणे रिटच्या माध्यमातून देखील तुमचे पैसे क्षेत्रातील अनुभवी व्यावसायिक चांगल्या व्यावसायिक केंद्रांमध्ये किंवा ऑफिस किंवा मॉलमध्ये गुंतवतात. तसेच कंपन्यांना जागा भाड्याने दिली जाते
व त्यातून जे काही भाडे मिळते ते खर्च वजा करून सर्व पैसे गुंतवणूकदारांना मिळतात. याबाबत सेबीचे नियम असून यामध्ये गुंतवणूकदारांना सहा महिन्यातून एकदा तरी भाडे/ लाभांश तसेच वितरण किंवा भाडे देणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर या माध्यमातून रिअल इस्टेटच्या किमतीमध्ये जर वाढ झाली तर भांडवलवाढीचा लाभ देखील गुंतवणूकदारांना मिळतो.
कशी करता येईल रिटमध्ये गुंतवणूक?
जसे आपण स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून शेअर्स खरेदी करतो अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट असलेले रिटचे शेअर्स खरेदी करता येतात त्यामध्ये प्रामुख्याने चार कंपन्या lअसून त्या पुढील प्रमाणे आहेत….
1- एम्बसी ऑफिस पार्क रिट
2- माईंडस्पेस बिझनेस पार्क्स रिट
3- ब्रुकफील्ड इंडिया रियल इस्टेट ट्रस्ट
4- नेक्सस सिलेक्ट ट्रस्ट