रिअल इस्टेट

घर- फ्लॅट खरेदी करण्यासाठी होम लोन घ्यायचे तर किती पगार असावी? ‘या’ सूत्रानुसार करा नियोजन नाहीतर हप्ते भरण्यातच जाईल आयुष्य

Published by
Ajay Patil

स्वतःच्या हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतात. नोकरी किंवा व्यवसायामधून जो काही पैसा मिळतो त्याची बचत करून घर घेण्यासाठी प्रयत्न केला जातो. परंतु घरांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे प्रत्येकाला घर घेणे शक्य होत नाही.

परंतु आता बँकांच्या माध्यमातून होमलोन अगदी सहजपणे मिळत असल्यामुळे केलेल्या बचतीचे डाऊन पेमेंट करून बाकीचे होम लोन घेऊन अगदी सहजरित्या लोकांना घर खरेदी करता येते. परंतु तुम्ही जर कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतले तर ते आपल्याला फेडावे लागते व त्याकरिता आपल्याला दर महिन्याला ईएमआय भरावा लागतो.

त्यासाठी आपले उत्पन्न आणि गरज यानुसार सगळे आर्थिक नियोजन करणे गरजेचे असते. कारण तुम्ही महिन्याला किती पैसा कमावत आहात आणि घेतलेल्या होम लोनचा ईएमआय महिन्याला किती भरावा लागेल? याचा सहसा विचार करूनच होमलोन घेऊन घर घेणे फायद्याचे ठरते.

 पगार आणि ईएमआय यांची सांगड घालणे गरजेचे

तुम्ही जर नोकरदार असाल तर तुमचा पगार आणि प्रत्येक महिन्याला भरावा लागणारा होमलोनचा ईएमआय या दृष्टिकोनातून नियोजन करणे गरजेचे आहे. साधारणपणे यामध्ये तुमचा होम लोनचा ईएमआय हा तुमच्या पगाराच्या जास्तीत जास्त वीस ते पंचवीस टक्केच असणे गरजेचे आहे.

उदाहरणच घ्यायचे झाले तर समजा तुमचा पगार एक लाख रुपये असेल तर तुम्ही महिन्याला 25 हजार रुपयांचा हप्ता सहज भरू शकता. परंतु जर पगार 50 ते 70 हजार रुपये असेल तर मात्र होम लोन घेऊन घर खरेदी करणे हे आर्थिक दृष्टिकोनातून खूप चुकीचे ठरू शकते. कारण होम लोन हे दीर्घकालीन लोन असते व कमीत कमी वीस वर्षाचा कालावधी साठी आपल्याला हे लोन फेडावे लागते.

म्हणून पगाराच्या रकमेपैकी 25% रक्कम जर तुमच्या होमलोनच्या ईएमआयवर खर्च होत असेल तर बिनधास्तपणे होम लोन घ्यावे. तसेच 50 ते 70 हजार रुपये पगार आहे व घराचा ईएमआय जर वीस हजार रुपये पेक्षा कमी येत असेल तरी तुम्ही घर खरेदी करू शकतात. यामध्ये तुम्ही 25 लाख रुपये किमतीचे घर आरामात खरेदी करू शकतात.

परंतु घराची किंमत जर तीस लाख रूपांपेक्षा जास्त असेल व तुम्हाला 50 ते 70 हजार रुपये पगार असेल तर स्वतःचे घर खरेदी करण्यापेक्षा भाड्याने राहणे आर्थिक दृष्टिकोनातून फायद्याचे ठरते.एक लाख रुपये पगार असेल तर तीस ते पस्तीस लाख रुपयांचे घर घेणे फायदेशीर ठरू शकते. ज्याची यावरून आपल्याला दिसून येते की तुमच्या पगाराच्या जास्तीत जास्त 25% पर्यंत तुमचा होमलोनचा ईएमआय असावा.

Ajay Patil