सध्या रियल इस्टेट क्षेत्राच्या दृष्टिकोनातून जर बघितले तर फ्लॅट किंवा घरांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढलेल्या असल्याने मोठ्या शहरामध्ये घर खरेदी करणे जवळपास आता अशक्य झालेले आहे. देशातील जर आपण प्रमुख शहरे बघितली तर यामध्ये घरांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढलेले असल्यामुळे परवडणाऱ्या घरांच्या खरेदी विक्रीमध्ये देखील आता खूप घट झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे.
परंतु यामध्ये जर आपण जानेवारी ते जून या सहा महिन्यातली आकडेवारी बघितले तर पुणे शहर संपूर्ण देशामध्ये परवडणाऱ्या घरांच्या विक्रीमध्ये प्रथम क्रमांकाचे शहर ठरले आहे. देशातील जे काही इतर महत्त्वाची मोठी शहरे आहेत त्यांच्या तुलनेमध्ये पुण्यातील घरांच्या सरासरी किमती कमी आहेत. त्यामुळे राहण्याकरिता पुणे हे एक परवडणारे शहर म्हणून पुढे आले आहे.
पुणे हाउसिंग रिपोर्ट मधील महत्वाची माहिती
सीआरई मॅट्रिक्स आणि क्रेडाई पुणे मेट्रो यांच्या माध्यमातून पुणे हाउसिंग रिपोर्ट सप्टेंबर 2024 पुढे आला असून या माध्यमातून ही सगळी माहिती समोर आलेली आहे. जर आपण हा अहवाल पाहिला तर यावर्षी पहिल्या सहामाहीत पुण्यात विक्री झालेल्या घरांची जर आपण सरासरी किंमत बघितली तर ती 71 लाख रुपये आहे.
परंतु तरीदेखील पुणे शहर देशातील परवडणाऱ्या शहरांच्या यादीमध्ये प्रथम स्थानी आलेली आहे. या वर्षाच्या पहिल्या सहामाही मध्ये पुण्यात एकतीस हजार कोटी रुपये मूल्याचे 40 हजार घरांची विक्री झालेली आहे यानुसार एकूण घरांच्या विक्री मूल्यांमध्ये वार्षिक 16 टक्क्यांची वाढ देखील नोंदवण्यात आलेली आहे.
इतकेच नाही ग्राहकांनी मोठ्या घर खरेदी करण्याला जास्त पसंती दिल्याचे देखील समोर आलेले आहे. तसेच पुण्यामध्ये 2019 च्या पहिल्या सहा महिन्याच्या तुलनेत यंदा पहिल्या सहामाहीत घरांची विक्री 36 टक्के वाढली आहे. अहवालानुसार इतर शहरांच्या तुलनेत पुणे आज देखील परवडणारे शहर आहे.
अहवालानुसार पुण्यातील कोणत्या भागात झाली जास्त घरांची विक्री?
1- अहवालानुसार बघितले तर माळुंगे, पाषाण,सुस, हिंजवडी, बाणेर, ताथवडे आणि वाकड या भागामध्ये पुण्यातील एकूण घरांच्या विक्रीच्या तब्बल 60% घरांची विक्री झालेली आहे.
2- कोथरूड, बावधन, वारजे आणि आंबेगाव या भागामध्ये 2020 च्या तुलनेनुसार बघितले तर 2024 च्या पहिल्या सहामाही मध्ये घरांच्या किमतीमध्ये तब्बल 44 टक्क्यांची वाढ झालेली आहे.
3- जर आपण शहरातील रोजगाराची स्थिती पाहिली तर मागच्या पाच वर्षापासून आठ टक्के रोजगारामध्ये वाढ झाली असल्यामुळे घरांसोबतच ऑफिस साठी आवश्यक असलेल्या जागा आणि वेअर हाऊस इत्यादींच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे व भविष्यात ही मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.