पुणे म्हटले म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक राजधानी आणि झपाट्याने आयटी हब म्हणून उदयास आलेली शहर आहे. महाराष्ट्रातील मुंबईनंतर दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून पुण्याला ओळखले जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उद्योगधंद्यांचा विकास झाल्यामुळे आणि आयटी क्षेत्रात आता पुणे झपाट्याने विकसित झाल्यामुळे आता तरुणाईचे आकर्षण ठरू लागलेले आहे.
साहजिकच आता नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आणि शिक्षणाच्या दृष्टिकोनातून अनेक तरुण आणि तरुणी पुण्याला पसंती देताना दिसून येतात. त्यामुळे साहजिकच असे तरुण-तरुणी जेव्हा पुणे शहरात येतात तेव्हा त्यांना राहण्यासाठी फ्लॅटची आवश्यकता भासते
असे तरुण-तरुणी पुण्यामध्ये स्वस्त दरात कुठे फ्लॅट मिळेल याच्या शोधात असतात. त्यामुळे आपण या लेखामध्ये तुम्ही जर पुण्यामध्ये राहण्यासाठी सर्वात स्वस्त जागा शोधत असाल तर त्याविषयी काही पुण्यातील महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती घेऊ ज्या ठिकाणी तुम्हाला स्वस्त फ्लॅट भाड्याने मिळू शकतात.
पुण्यात या ठिकाणी मिळेल तुम्हाला स्वस्त दरात भाड्याने फ्लॅट
1- कात्रज- कात्रज हे कोल्हापूर आणि बेंगलोरला जोडणारा जो काही राष्ट्रीय महामार्ग चार आहे त्याच्याजवळ असून तरुणांसोबत व्यवसायिकांसाठी देखील पुण्यातील हे एक प्रसिद्ध स्थान आहे. कात्रज स्वारगेट बस आगाराजवळ असून या ठिकाणहून संपूर्ण पुणे शहरात बस धावतात
तुम्हाला पुणे शहरात कुठेही प्रवास करायचा असेल तर सोयीचे ठरते. अगोदरचा जो काही कात्रज तलावाचा परिसर होता तो आता निवासी संकुलांनी पूर्णपणे विकसित झाला असून या ठिकाणी तुम्हाला स्वस्त दरात भाड्याने फ्लॅट मिळतात. साधारणपणे या ठिकाणी एक बीएचके फ्लॅटचे भाडे सात हजार दोनशे ते आठ हजार चारशे पर्यंत आहे.
2- वारजे- पुणे शहरापासून आपल्या 12 किलोमीटर अंतरावर हे एक प्रसिद्ध असे स्थान असून गेल्या दहा वर्षांमध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर विकास झाल्याचे दिसून येते.
या ठिकाणाला कोथरूडचा अध्यात्मिक विस्तार म्हणून देखील ओळखले जाते. वारजे येथून एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण अकादमी खूपच जवळ आहे. या ठिकाणी तुम्हाला वन बीएचकेचा फ्लॅट हा 7800 ते 8500 रुपये प्रति महिना दराने मिळू शकतो.
3- धायरी- हे ठिकाण सिंहगड रोड आणि राष्ट्रीय महामार्ग चारच्या जवळ असून या ठिकाणी असलेली सिम्पनी आयटी पार्क आणि खडकवासला धरण पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. धायरीमध्ये देखील तुम्हाला स्वस्त फ्लॅट मिळू शकतात.
साधारणपणे धायरी येथे एक बीएचके फ्लॅटचे भाडे सहा हजार दोनशे ते सात हजार पाचशेच्या दरम्यान असून या ठिकाणी एशियन कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सिंहगड कॉलेज सारख्या महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था देखील आहेत. एवढेच नाही तर या ठिकाणी पु. ल. देशपांडे गार्डन आणि अभिरुची मॉल आणि मल्टिप्लेक्स आहे.
4- विश्रांतवाडी- हा भाग क्षेत्रफळाने खूप मोठा आहे. तरीही पुणे शहरातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला भाग म्हणून ओळखला जातो. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ असलेला हा परिसर असून चांगल्या पायाभूत सुविधा आणि तुलनेने शांत असा परिसर आहे.
या ठिकाणच्या आजूबाजूला असलेल्या विमान नगर आणि मांजरी सारख्या ठिकाणी किंमत जास्त असल्याने विश्रांतवाडीत स्वस्त फ्लॅट मिळू शकतात.
साधारणपणे विश्रांतवाडी येथे एक बीएचके फ्लॅटचे भाडे सात हजार पाचशे ते आठ हजार दोनशे इतके आहे. या ठिकाणी एसएनबीपी कॉलेज आणि आंबेडकर महाविद्यालयासारखे शैक्षणिक संस्था असून श्री महालक्ष्मी मिनी मॉल आणि क्रिएटिव्ह सिटी मॉल देखील आहे.
5- भोसरी- राहण्यासाठी जर तुम्ही शांत ठिकाणाच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी भोसरी ठिकाण खूप महत्त्वाचे ठरेल व तुमच्या खिशाला देखील परवडेल. भोसरी हे पुण्याचे सर्वात प्रसिद्ध औद्योगिक क्षेत्र असून या ठिकाणी एमआयडीसी,
टाटा मोटर्स यासारखे उद्योग या परिसराच्या मध्यभागी आहेत. या ठिकाणी हळूहळू अनेक पायाभूत सुविधाची निर्मिती होत असल्याने अनेकांचे आवडते केंद्र बनत आहे.
या ठिकाणी तुम्हाला एक बीएचके फ्लॅट आठ हजार सातशे ते नऊ हजार सातशे रुपये प्रति महिना दराने मिळू शकतो.
तुम्ही पुण्यातील हिंजवडी, धनकवडी आणि वाघोली सारख्या परिसराची देखील निवड करू शकतात.