रिअल इस्टेट

Mhada News: आधार आणि पॅन कार्डची नोंदणी करून करता येईल स्वप्नातील घराची खरेदी! म्हाडाच्या माध्यमातून मिळेल 24 लाखात वन बीएचके फ्लॅट

Published by
Ajay Patil

Mhada News:- जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती जे काही स्वप्न पाहत असते त्यामध्ये प्रामुख्याने स्वतःच्या स्वप्नातील हक्काचे घर हे प्रमुख असते. प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की आपले स्वतःचे घर असावे. परंतु घराच्या वाढलेल्या प्रचंड किमतीमुळे प्रत्येकालाच ते शक्य होत नाही.

पण जर तुम्हाला मोठ्या शहरांमध्ये घर घ्यायची इच्छा असेल तर म्हाडा सारख्या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून तुमचे मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. आपल्याला माहित आहेच की सरकारच्या म्हाडा आणि सिडको सारख्या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून घरांसाठी लॉटरी काढल्या जातात

व त्या माध्यमातून भाग्यवान विजेतांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होते. अगदी याच पद्धतीने आता म्हाडाच्या माध्यमातून आधार व पॅन कार्डची नोंदणी करून स्वप्नातील घर खरेदी करता येणार आहे व अशा प्रकारचे आवाहन म्हाडाच्या माध्यमातून सोशल मीडियावर करण्यात आले आहे.

 म्हाडाच्या माध्यमातून 24 लाखात मिळणार वन बीएचकेचा फ्लॅट

याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हाडाच्या माध्यमातून असलेली जी घरे अदयापपर्यंत विक्री झालेली नाहीत किंवा ज्या घरांना ग्राहकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे किंवा प्रतिसादच मिळालेला नाही अशा घरांची विक्री व्हावी याकरिता म्हाडाच्या माध्यमातून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.

याच उपाययोजनांचा भाग म्हणून आता विरार- बोळींज मधील घरे  विकण्याकरिता म्हाडाच्या माध्यमातून आधार व पॅन कार्डची नोंदणी करून घर खरेदी करा अशा आशयाचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणच्या सर्व इमारतींना म्हाडाने भोगवटा प्रमाणपत्र अर्थात ओसी प्राप्त झाल्याची माहिती देखील दिली आहे.

या ठिकाणी जे घर वन बीएचके चे आहे त्या त्याची किंमत 23 लाख 28 हजार 566 रुपये आहे तर टू बीएचके घराची किंमत 41 लाख 81 हजार 834 आहे. विशेष म्हणजे यामध्ये प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या योजनेच्या माध्यमातून जे घरे तयार आहेत त्यांचे लॉटरीशिवाय वितरण करण्यात येणार आहे.

जर रक्कम पूर्ण भरली तर दोन आठवड्यामध्ये घराचा ताबा दिला जाईल. विशेष म्हणजे पॅन आणि आधार कार्डद्वारे पात्रता निश्चिती केली जाईल अशी माहिती देखील म्हाडाने दिली आहे.

यासाठीच्या अधिक माहिती करिता वांद्रे येथील म्हाडाच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. यामध्ये पाच हजार घरांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर करण्यात येत असून या योजनेसाठी असलेल्या सवलती घर खरेदीदारांसाठी जाहीर करण्यात आलेले आहेत.

Ajay Patil