file photo

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :- रेडमी 28 ऑक्टोबर रोजी आपली मिड-रेंज स्मार्टफोन सीरीज Redmi Note 11 सीरीज लॉन्च करेल. आता या स्मार्टफोन सीरिज लाँच होण्यासाठी काही दिवसच उरले आहेत.

शाओमी च्या आगामी Redmi Note 11 सिरीजमधील तीन स्मार्टफोन – Redmi Note 11, Redmi Note 11 Pro, आणि Redmi Note 11 Pro plus लाँच केले जातील.

शाओमीच्या च्या आगामी स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाले तर असे सांगितले जात आहे की Redmi Note 11 Pro Plus स्मार्टफोन 4,500mAh ड्युअल सेल बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग सह ऑफर केला जाईल.यासोबतच, रेडमी ने पुष्टी केली आहे की प्रो वेरिएंटमध्ये 108MP फ्रंट कॅमेरा दिला जाईल.

Redmi Note 11 Pro / Pro Plus मध्ये 108MP प्राथमिक कॅमेरा उपलब्ध असेल :- Redmi Note 11 Pro व्हेरिएंटचे टीझर पोस्टर दर्शविते की हा स्मार्टफोन 108MP प्राथमिक कॅमेरा सेन्सरसह ऑफर केला जाईल.

शाओमी च्या या फोनच्या कॅमेरा सेटअपमध्ये अल्ट्रा वाइड लेन्स आणि टेलिफोटो कॅमेरा लेन्स देखील दिले जातील. शाओमी च्या आगामी Red Note 11 Pro आणि Red Note 11 Pro Plus स्मार्टफोन्सबद्दल, असे सांगितले जात आहे की या फोनमध्ये 108MP Samsung HM1 सेंसर दिला जाईल.

Redmi Note 11 सिरीज :- लीक झालेल्या अहवालानुसार Redmi Note 11 Pro स्मार्टफोन ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 920 चिपसेटद्वारे सपोर्टिव्ह असेल.

Redmi Note 11 Pro Plus स्मार्टफोन बद्दल बातमी आहे की तो MediaTek Dimensity 1200 AI चिपसेट सह ऑफर केला जाईल.

यासह, स्टँडर्ड Redmi Note 11 स्मार्टफोन MediaTek च्या Dimensity 820 chipset सह लॉन्च केला जाईल. यासोबतच, Redmi Note 11 Pro व्हेरिएंटचे फोन 120Hz AMOLED पॅनल आणि 120Hz IPS LCD पॅनलसह ऑफर केले जातील.

यासोबतच, आगामी Redmi Note 11 लाइनअपबद्दल असे सांगितले जात आहे की तीन स्मार्टफोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक आणि IR ब्लास्टर दिले जातील.