अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- ओमायक्राॅनच्या धास्तीने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्यांची करोना चाचणी करण्यात येत आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात 27 प्रवासी आलेले असून यातील 13 जणांच्या करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 12 अहवालाची प्रतिक्षा आहे.

दोन व्यक्तींचा शोध जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. ओमायक्राॅनमुळे बाहेरच्या देशातून येणार्‍यांची आधी करोना चाचणी करण्यात येत आहे.

जिल्ह्यात 3 डिसेंबरला 15 प्रवासी आलेले होते. यात कोपगरगाव 2, राहाता आणि राहुरी प्रत्येकी 3, संगमनेर 1, श्रीरामपूरात 4 आणि नगर मनपा हद्दीतील दोघांचा समावेश होता.

तर 5 डिसेंबरला अकोल्यात 4, कोपरगाव 2, राहाता 1 आणि नगर मनपा हद्दीतील 5 जणांचा यात समावेश आहे. दोन दिवसात जिल्ह्यात 27 जण बाहेरच्या देशातून प्रवास करून आलेले आहेत.

यातील 25 जण सोपडले असून उर्वरित दोघांची शोध मोहिम सुरू आहे. 12 जणांच्या चाचणीचे अहवाल येणे बाकी असून यात अकोल्यातील 4, कोपरगाव 2, राहाता 1 आणि नगर मनपा हद्दीत पाच जणांचा समावेश आहे.