अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- कर्जत तालुक्यात खेड व परिसरातुन वाहणाऱ्या भीमा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू होता याबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या.(Department of Revenue)

या पार्श्वभूमीवर कर्जत व दौंडच्या महसूल पथकानी भीमा नदी पात्रात संयुक्त कारवाई करत १४ यांत्रिक बोटींना जलसमाधी दिली. या कारवाईने वाळू तस्करी करणारे चांगलेचहादरले आहेत.

या भागातील वाळू तस्करीबाबत महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत होता. यावर कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दोन दिवसांपूर्वी एक ट्रकवर कारवाई केली होती.

तसेच वाळू रक्षणाची जबाबदारी गाव पातळीवरील पथकाची असल्याचे सांगत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व पोलीस पाटील यांना नोटीस पाठवणार असल्याचे म्हटले होते.

यानंतर प्रांताधिकारी अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे ४ ते सायंकाळी साडे चार वाजे पर्यंत खेड, गणेशवाडी, दुधोडी परिसरात १४ यांत्रिक बोटींवर कारवाई केली.

यात कर्जत हद्दीतील गणेशवाडी, दुधोडी, खेड येथील ६ व दौंड हद्दीतील मलठण,वाटलूज, येथील ८ अशा एकूण १४ वाळू उपसा करणाऱ्या फायबर बोटींना जलसमाधी दिली.