file photo

अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :- नगर शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. दिवसेंदिवस चोऱ्या, लूटमार, दरोडा आदी घटनांमध्ये वाढ जपू लागल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आला आहे.

नुकतेच नगर शहरातील अत्यंत वर्दळीच्या परिसरात एकास शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली आहे. नगर शहरातील नालेगाव अमरधाम शेजारील कल्याण रोडवर असलेल्या गणपती विसर्जन बारवे समोर 22 वर्षिय तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली.

याबाबत प्रकाश सदाशिव वाल्हेकर (रा. रामवाडी, सर्जेपूरा) याने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अमरधाम शेजारील बारवेजवळ आरोपी रोहित बबन बुरकुले (वय 28, रा.दातरंगे मळा, नगर)

याने कोयत्याचा धाक दाखवून आपल्या खिशातील 3 हजार 500 रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतल्याचे वाल्हेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपी बुरकुले विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.