अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा आज वाढदिवस आहे. विशेषबाब म्हणजे आजच्या दिवशी रोहित यांची पत्नी कुंती पवार यांचाही वाढदिवस असतो.

पत्नीच्या वाढदिवसाला रोहित पवार यांनी खास फेसबुक पोस्ट लिहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आमदार रोहित पवार यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमधून म्हणाले…

घराला घरपण, नात्यांना वळण, कायम साथ आणि कठीण प्रसंगात हात देणाऱ्या, जीवनाचा सहप्रवासी होऊन कुटुंब सांभाळणाऱ्या जीवनसाथी सौ. कुंतीचाही माझ्यासोबतच आज वाढदिवस.

यानिमित्त तिला हार्दिक शुभेच्छा! तिला देण्यासाठी माझी ओंजळ सतत आनंदाने भरलेली राहो आणि तिला दीर्घायुष्य लाभो,ही प्रार्थना, अशा शब्दात रोहित पवार यांनी पत्नी कुंती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

फेसबुकवर केलेल्या पोस्टमधून रोहित पवारांनी पत्नी कुंती हिचे आपल्या आयुष्यातील स्थान किती महत्वाचे आहे हे दाखवून दिले आहे. दरम्यान आज रोहित आणि कुंती पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.