अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- घोड डावा कालवा लाभक्षेत्रामध्ये सध्या पाण्याची नितांत आवश्यकता असून घोड लाभक्षेत्राखालील शेतकऱ्यांची चालू पिकांसाठी पाणी लवकरात लवकर मिळावे, अशी मागणी होती.(MLA Pachpute )

त्यानुसार ४ डिसेंबरला जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घोड डाव्या कालव्याचे आवर्तन १० जानेवारी २०२२ पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

परंतु सद्यस्थितीमध्ये लाभधारक शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामाकरिता पाणी सोडण्याची तीव्र मागणी होत होती. हे आवर्तन आता १ जानेवारीपासून सोडण्यात येणार आहे.

लाभधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी त्यांचे हक्काचे पाणी मिळावे यासाठी आमदार बबनराव पाचपुते यांनी आमदार अशोक पवार व आमदार रोहित पवार यांच्याशी चर्चा करून

अधीक्षक अभियंता (कुकडी व घोड प्रकल्प), पुणे यांच्याशी पत्रव्यवहार करून १ जानेवारीला पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्याबाबत सुचवले.