file photo

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :-  शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी साईभक्तांच्या गर्दीचा ओघ शनिवारी व रविवारी मोठ्या संख्यने असलेला दिसून आला. साई दर्शनासाठी ऑनलाईन पास असणे

अत्यावश्यक केल्याने अनेक भाविकांना साईबाबांच्या समाधी दर्शनाऐवजी मंदिराचा कळस तसेच द्वारकामाई व चावडीचे दर्शन घेऊन समाधान मानावे लागले.

गेली दीड-दोन वर्षांपासून करोना महामारीमुळे साईंचे दर्शन व आशीर्वाद न घेतल्याने भाविक साईसमाधी दर्शनासाठी आतुर झाल्याने भाविकांची शिर्डीत दिवसेंदिवस आता चांगलीच गर्दी वाढत आहे.

यामुळे दररोजच्या दर्शनाच्या संख्येची मर्यादा 15 हजारांहून अधिक वाढवणे आता गरजेचे बनले आहे. अनेक भाविक साईसमाधीचे दर्शन मिळत नसल्याने नाराजी व्यक्त करत आहे

साईबाबा संस्थान प्रशासनाच्यावतीने साई दर्शनासाठी दररोज फक्त पंधरा हजार भाविकांना दर्शनपास देण्याची मर्यादा ठेवली असल्याने अनेक भक्तांना ऑनलाईन पास मिळत नाही तर ऑनलाईन दर्शन बुकिंग करून आलेल्या

साईभक्तांना पासची प्रिंट काढून घेण्यासाठी झेरॉक्स सेंटर व कॉम्प्युटर सेंटर अथवा कॅफेबाहेर रांगेत उभे राहून तासनतास प्रिंटसाठी प्रतीक्षा करावी लागली.