7th Pay Commission : केंद्र सरकारच्या (Central Govt) कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी (Good news) आहे. कारण या कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात मोठी पगारवाढ (salary increase) मिळू शकते.

अनेक दिवसांपासून हे कर्मचारी महागाई भत्त्याची (DA) आतुरतेने वाट पाहत आहेत. यासोबतच फिटमेंट फॅक्टरमध्येही (Fitment factor) वाढ होऊ शकते.

फिटमेंट फॅक्टर वाढवता येतो

महागाई भत्त्यात वाढ झाल्याने केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या (Central Staff) फिटमेंट फॅक्टरमध्येही वाढ करू शकते. फिटमेंट फॅक्टर वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात वाढ होणार आहे.

फिटमेंट फॅक्टर वाढविण्याची मागणी अनेक दिवसांपासून सरकारी नोकरदारांकडून केली जात आहे. सध्या तो 2.57 टक्क्यांच्या पातळीवर असून, तो 3.68 टक्के करण्याची मागणी केली जात आहे. त्यात वाढ केल्यास किमान मूळ वेतन 18 हजारांवरून 26 हजार रुपये होईल.

दिवाळीत फिटमेंट फॅक्टर वाढू शकतो

मीडियामध्ये सुरू असलेल्या बातम्यांनुसार, दिवाळी किंवा दसऱ्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सर्व कर्मचार्‍यांचे मूळ वेतन फिटमेंट फॅक्टरद्वारेच ठरवले जाते.

नवरात्रीमध्ये महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढू शकतो

केंद्रीय कर्मचारी डीएमध्ये वाढ (Increase in DA) करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या नवरात्रीला सरकार डीएमध्ये 4 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा करू शकते.

या वर्षाबद्दल बोलायचे झाले तर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ निश्चित असल्याचे मानले जात आहे. 28 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरी मिळू शकते.

यानंतर, वाढीव महागाई भत्ता जुलै 2022 पासून लागू होईल. याशिवाय, अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक अर्थात AICPI च्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की, केवळ या वर्षीच नाही तर पुढील वर्षीच्या जानेवारीतही केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे.