file photo

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या लग्नाविषयी) अनेकांना उत्सुकता आहे. आजवर सलमानचे नाव वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत जोडले गेले.

मात्र सलमानचं लग्न अद्याप झालेलं नाही. अशातच सलमानचे जवळचे मित्र आणि अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सलमानच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे.

महेश मांजरेकर यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी, “कधी कधी मी सलमानसोबत अनेक विषयांवर बोलतो.इतर कुणी बोलू शकणार नाही अशा विषयांवर आमची चर्चा होते. मी सलमानला म्हणालो होतो की तू लग्न करत नाहीस याचे मला फार वाईट वाटते.

माझी इच्छा आहे की तू लग्न करावे. मला सलमानची मुले पाहायची आहेत. अनेकदा तो माझ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो. पण मला असे जाणवले की त्याला देखील कुणाची तरी गरज आहे”, असे म्हटले.

पुढे महेश मांजरेकर म्हणाले, “कधी कधी मला असे जाणवते की तो बाहेरुन जितका आनंदी असल्याचं दिसतं तितकाच आतून एकटा आहे. तुम्हाला माहिती असेल सलमान जिथे राहतो तो एक बेडरुम असलेला फ्लॅट आहे.

जेव्हा मी त्याच्या घरी जातो तेव्हा तो ड्रॉइंग रुममधील सोफ्यावर झोपलेला असतो. सलमान एक यशस्वी अभिनेता आहे. सलमानचे अनेक मित्रमैत्रीण आहेत. ते सलमावर खूप प्रेम करतात.

पण सलमानला जिवापाड प्रेम करणारी कुणी तरी हवी.” सध्या सलमान लुलिया वंतुरला डेट करत असल्याचे म्हटले जाते. पण त्याने अद्याप यावर वक्तव्य केले नाही. लुलियाचे सलमानच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर दिसतात.