Samsung Smartphone : मोबाइल बाजारात (mobile market) आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने (Samsung) एक जबरदस्त स्मार्टफोन (smartphone) लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन A सीरीज अंतर्गत लॉन्च करण्यात आला आहे.

हे पण वाचा :-  LIC Scheme : संधी गमावू नका ! एलआयसीच्या ‘या’ योजनेत मिळत आहे 10 पट नफा,जाणून घ्या सर्वकाही

या स्मार्टफोनचे नाव Samsung Galaxy A04e आहे. हा स्मार्टफोन जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह उपलब्ध आहे. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची माहिती.

हे पण वाचा :- SBI Customer : एसबीआय ग्राहक सावधान ‘ही’ चूक केल्यास बसणार मोठा फटका ; जाणून घ्या नेमकं प्रकरण

Samsung Galaxy A04e स्पेसिफिकेशन

कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये मुख्य लेन्स 13MP आहे तर दुसरा कॅमेरा 2MP आहे. सेल्फीसाठी 5MP कॅमेरा आहे. पॉवरसाठी कंपनीने 5000 mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक आहे.

Samsung Galaxy A04e किंमत

स्मार्टफोन 3/32GB, 4/64GB आणि 4/128GB व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. मात्र, तिन्ही व्हेरियंटच्या किमती कंपनीने जाहीर केलेल्या नाहीत. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी लवकरच भारतीय बाजारात लॉन्च करू शकते. त्याची किंमत 10,000 रुपये ते 18000 रुपयांच्या दरम्यान ऑफर केली जाऊ शकते. हा स्मार्टफोन 4 कलर पर्यायांसह उपलब्ध आहे, ज्यामध्ये ब्लॅक, ऑरेंज कॉपर आणि लाइट ब्लू समाविष्ट आहे.

हे पण वाचा :- IMD Alert : नागरिकांनो लक्ष द्या ! ‘या’ राज्यांमध्ये पुन्हा बिघडणार हवामानाचा मूड ; जाणून घ्या कुठे होणार मुसळधार पाऊस