Maharashtra news : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अग्निपथ योजनेवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसेच अग्निवीर या योजनेतून लष्करात भरती होण्यापेक्षा शिवसेनेत यावे, येथे त्यापेक्षा चांगली संधी मिळेल, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

त्यांच्या या विधानावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.या योजनेवर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, “तरुण जर शिवसेनेत आले तर त्या तरुणांना अग्निपथ योजनेंतर्गत लष्करात भरती होण्याच्या तुलनेत ४ वर्षात चांगली संधी मिळेल.

“गेल्या निवडणुकीत तरुण ४ वर्षे प्रशिक्षणाशिवाय चौकीदार बनले होते आता ते ४ वर्षाच्या लष्करी प्रशिक्षणासह चौकीदार होतील