Sanjay Raut's warning to Eknath Shinde in 'that' case
Sanjay Raut's warning to Eknath Shinde in 'that' case

Eknath Shinde: पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप आला आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर (MLC Elections) सत्ताधारी शिवसेनामध्ये (Shiv Sena) मोठी फूट पडल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारला(MVA) धोका निर्माण झाला आहे.

राज्याचे नगर विकास मंत्री आणि शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे तब्बल 21 आमदार फोडून गुजरातला नेले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून अनेक चर्चांना उधाण आले आहे.

 तर दुसरीकडे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची भूमिका समजून घेण्यासाठी पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर(Milind Narvekar) आणि नेते रवींद्र फाटक (Ravindra Phatak) गेले होते. अर्धा तास त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांनी चर्चा केली आहे. मात्र या भेटीत झालेल्या चर्चा, अटी-शर्ती, मागण्या किंवा प्रस्ताव यांचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.यातच शिवसेना हा पक्ष अटीशर्थींवर चालत नाही, असं वक्तव्य  शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. 

 
काय म्हणाले संजय राऊत  ?

“मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे एकनाथ शिंदे यांना भेटले. एकनाथ शिंदेंचा नवीनच प्रस्ताव समोर आला आहे. पण शिवसेना हा पक्ष अटीशर्थींवर चालत नाही. भाजपसोबत असलेली 25 वर्षांची युती ज्या कारणामुळे तोडावी लागली, ती एकनाथ शिंदेंना माहित आहे.

त्यांच्याकडून वारंवार अपमान होत असे, दिलेला शब्द पाळला गेला नाही, याची शिंदेंना कल्पना आहे. त्यांची नवीन भूमिका माहिती नाही. पण आमच्याकडून त्यांच्याशी संवादाचा प्रयत्न सुरु आहे. मिलिंद नार्वेकर आता उद्धव ठाकरेंशी बोलतील” असं संजय राऊत म्हणाले. शिवसेनेचे किती आमदार पक्षासोबत आहेत, असा प्रश्न विचारल्यावर सकाळी वर्षावर 31 आमदार होते, अशी माहिती राऊतांनी दिली.

गटनेते पदावरुन हकालपट्टी

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेने मोठी कारवाई केली आहे. शिंदेंना शिवसेनेच्या गटनेते पदावरुन हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी आमदार अजय चौधरी (Ajay Chaudhari) यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे आणि शिंदे समर्थक गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. नव्याने नियुक्ती झालेले अजय चौधरी हे मुंबईतील शिवडी मतदारसंघाचे विधानसभा आमदार आहेत.