अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- लग्न समारंभासाठी खरेदी केलेल्या साड्या आणि शर्टचे कापड चोरीला गेले. कामरगाव (ता. नगर) येथे 27 ते 30 डिसेंबर दरम्यान ही घरफोडी झाली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओंकार बबन सांगळे (वय 30) यांच्या घरी लग्न समारंभासाठी नवीन साड्या व शर्टचे कपडे आणून ठेवले होते. चोरट्यांनी सोमवारी सायंकाळी सात ते 30 डिसेंबरला सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

आठ हजार रुपये किंमतीचे नवीन कपडे चोरले. सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.