PM Kisan Yojana
PM Kisan Yojana

Sarkari Yojana Information : केंद्र सरकारकडून (Central Goverment) शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) सुरु करण्यात आली आहे. याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होत आहे. त्यामुळे शेतीला थोडा का होईना हातभार लागत आहे.

याअगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात १० हफ्ते वर्ग करण्यात आले आहेत. मात्र आता शेतकरी ११ व्या हफ्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र केंद्र सरकारकाडून खात्याला eKYC करणे बंधनकारक केले आहे, अन्यथा खात्यात पैसे येणार नाहीत.

शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची मदत करते. हे पैसे सरकार 3 हप्त्यांमध्ये जारी करते. प्रत्येक हप्ता 2,000 रुपये आहे. दुसरीकडे,

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता eKYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्याची मुदत सरकारने वाढवली आहे. केंद्र सरकारने अनिवार्य eKYC पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३१ मे २०२२ पर्यंत वाढवली आहे.

यापूर्वी eKYC ची अंतिम मुदत ३१ मार्च २०२२ होती. जी सरकारने 22 पर्यंत वाढवली. त्यानंतर ती वाढवून 31 मे 2022 करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलनुसार, पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचे ईकेवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. OTP द्वारे eKYC PM किसान पोर्टलवर उपलब्ध आहे.

बायोमेट्रिक पद्धतीने eKYC करायचे असल्यास जवळच्या CSC केंद्राशी (CSC Center) संपर्क साधता येईल. सर्व PM किसान लाभार्थ्यांसाठी eKYC ची अंतिम मुदत 31 मे 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

अनिवार्य eKYC पूर्ण केल्यानंतरच शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांचा लाभ मिळू शकेल. पीएम किसानला दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयांचा हप्ता दिला जातो. ज्यांनी eKYC पूर्ण केले आहे आणि ज्यांच्याकडे लागवडीयोग्य जमीन आहे अशा सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल.

अशा परिस्थितीत तुम्हाला वार्षिक 6,000 रुपये मिळणार नाहीत

पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलनुसार, लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांचा बँक खाते क्रमांक त्यांच्या आधार क्रमांकासह द्यावा लागेल. जेणेकरून या योजनेअंतर्गत सरकार थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा करू शकेल. बँक खाते दिले नसल्यास कोणताही लाभ दिला जाऊ शकत नाही.

eKYC कसे करायचे ते जाणून घ्या

सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.nic.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर, फार्मर्स कॉर्नर विभागात eKYC पर्यायावर क्लिक करा. यामध्ये ओटीपीद्वारे ईकेवायसी करता येते.

यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल आणि सर्च वर क्लिक करावे लागेल. यानंतर, आधारशी लिंक केलेला नंबर टाका. त्यानंतर Get OTP वर क्लिक करा. आता मोबाईलमध्ये मिळालेला OTP टाका. यानंतर तुमचे eKYC पूर्ण होईल.

या क्रमांकांवर संपर्क करा

तथापि, लाभार्थी कोणत्याही मदतीसाठी पीएम-किसान हेल्पलाइन क्रमांक 011-24300606, 155261 वर संपर्क साधू शकतात. यासोबतच आधार ओटीपीशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी तुम्ही [email protected] वर मेल करू शकता.