अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- कॉलेजला जातो असे सांगून युवक घरातून निघून गेला आहे. अभिषेक रावसाहेब ठुबे (वय 20 रा. सोनेवाडी रोड, केडगाव) असे बेपत्ता युवकाचे नाव आहे.

त्याचा भाऊ ऋषिकेश रावासाहेब ठुबे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

अभिषेकचा रंग गोरा, उंची 5.6 फूट, शरीरबांधा मध्यम, डोक्याचे केस तांबडे कुरळे, नाक सरळ, अंगात चॉकलेटी रंगाचा शर्ट, काळी फूल पॅन्ट, सोबत दुचाकी व मोबाईल आहे.

अभिषेक विषयी कोणाला काही सांगायचे असल्यास त्यांनी कोतवाली पोलीस किंवा पोलीस नाईक बाबासाहेब इखे यांच्याशी संपर्क साधावा, असे आव्हान करण्यात आले आहे.