SBI RBO recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सेवानिवृत्त बँक अधिकारी (RBO) च्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून (eligible candidates) ऑनलाइन अर्ज (Online application) मागवले आहेत.

पात्र उमेदवार sbi.co.in/web/careers या अधिकृत वेबसाइटवर 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत रिक्त पदांसाठी अर्ज (Application) करू शकतात. या भरती मोहिमेचे उद्दिष्ट एकूण 47 रिक्त पदे भरणे आहे. 47 रिक्त पदे (Post) भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे.

वयोमर्यादा जाणून घ्या

10 ऑक्टोबर 2022 रोजी रिक्त पदांसाठी अर्ज करण्याचे किमान वय 60 वर्षे आणि कमाल वय 63 वर्षे आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्जदार हे SBI चे सेवानिवृत्त अधिकारी आहेत, त्यामुळे कोणत्याही विशेष शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही. पुरेसा कामाचा अनुभव, यंत्रणा आणि प्रक्रियांचे सखोल ज्ञान आणि संबंधित क्षेत्रातील एकूण व्यावसायिक क्षमता असलेल्या माजी अधिकाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.

येथे तपासा अधिकृत अधिसूचना

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

एसबीआय आरबीओ भर्ती 2022: अर्ज कसा करावा?

sbi.co.in/web/careers येथे SBI करिअर पेजला भेट द्या.
“कंत्राटी आधारावर सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याची नियुक्ती” अंतर्गत अर्ज लिंकवर क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी नोंदणी करा आणि लॉग इन करा.
तपशील भरा, फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या