file photo

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीसाठी हाताच्या स्वच्छतेचे अनन्यसाधारण महत्त्व असते. स्वच्छते संबंधी महत्व लक्षात घेऊन 15 ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो.

कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर हात धुवा या दिवसाचे महत्त्व खूप मोठे असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शाळा अंगणवाडी माध्यमिक शाळा व तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये विविध कार्यक्रम आयोजित करावेत.

तसेच साबणाने हात स्वच्छ धुऊन निरोगी राहणे बाबत विशेष जनजागृती करून लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व सांगताना हात धुण्याचे चे प्रात्यक्षिक करून दाखवणे आवश्यक असून हात धुण्याचे फायदे तोटे सांगितल्यास वर्तन बदलास मदत होणार आहे.यासाठी शालेय विद्यार्थ्यांसोबत हात धुण्याचे महत्त्व व त्यांचा आरोग्यास होणारा लाभ याबाबत चर्चा व संवाद साधण्यात यावा.

शालेय स्तरावर या दिवसानिमित्त” हाताची स्वच्छता” या विषयावर निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, व पोस्टर तयार करणे आशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात याव्या.

घरोघरी जाऊन साबण गोळा करण्यात यावे.तसेच ग्रामपंचायतीमध्ये ही 15 ऑक्टोबर रोजी”हात धुवा दिवस” साजरा करावा त्यामध्ये सर्व सरपंच ,सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच गावातील महिला बचत गट ,ग्रामसेवक यांनीही गाव पातळीवर सार्वजनिक ठिकाणी सामूहिकपणे,” हात धुवा दिवस”प्रात्यक्षिक करावेत.

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी व शिक्षण अधिकारी व गाव पातळीवर शाळांमध्ये सर्व शिक्षक यांना गाव पातळीवर “हात धुवा दिवस”ही मोहीम

यशस्वी करण्याचे आहवान यानिमित्ताने करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा अंगणवाडी व ग्रामपंचायतीमध्ये हा दुवा दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे.