राज्यातील शाळा ह्या दिवसा पासूनच सुरु होणार !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- राज्यातील शालेय विध्यार्थ्यासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे , राज्यातील शाळा येत्या 1 डिसेंबरपासूनच सुरु होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 1 ली ते इयत्ता 4 थी व महापालिका हद्दीतील इयत्ता 1 ली ते 7 वीचे वर्ग 1 डिसेंबपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे या शासन निर्णयात सांगण्यात आले आहे.

शाळा सुरु करताना नेमकी कोणती खरबदारी घ्यावी, यासाठी राज्य सरकारने नियमावलीदेखील जारी केली आहे.सध्या ओमिक्रॉन या कोरोनच्या नव्या रुपाचा सर्वांनीच धसका घेतलाय. या विषाणूविरोधात लढण्यासाठी जगभरात वेगवेगळे निर्बंध घातले जात आहेत. राज्य सरकारनेदेखील आरोग्य विभागाला सूचना दिलेल्या आहेत.

याआधी राज्य सरकारने राज्यातील शाळा येत्या 1 डिसेंबरपासून सुरु होणार असे जाहीर केले होते. मात्र ओमिक्रॉन विषाणूमुळे शाळा उशिराने सुरु केल्या जाणार का असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.

ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात महानगरपालिका क्षेत्रातील 8 वी ते 12 वीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात मागील काळात निर्णय घेण्यात आला होता.

त्यानुसार त्या शाळा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवी या शाळा 1 डिसेंबर रोजीच सुरु होणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!