Feeding bunks on a farm in Saskatchewan

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :-  नगर शहरातील झेंडीगेट परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री केली जात असल्याचे कोतवाली पोलिसांकडून सलग सुरू असलेल्या कारवाईतून समोर आले आहे.(Sale of beef)

शनिवारी कत्तलीसाठी जाणारा गोवंशीय जनावरांचा टेम्पो पोलिसांनी पकडला होता. रविवारी नऊ हजार रूपये किंमतीचे 55 किलो गोमांस पोलिसांनी जप्त केले.

झेंडीगेट येथे मिरा हॉटेल चौकात गोवंशीय जनावरांचे मांस विक्री चालू असल्याची खबर पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती.

त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे, दीपक रोहकले, बापुसाहेब गोरे, सागर पालवे, ए. पी. इनामदार यांना कारवाई करण्याच्या सूचाना दिल्या.

इंगळे यांच्या पथकाने दुपारी एक वाजेच्या सुमारास छापा टाकला असता दुकानात जाकीर खलील कुरेशी (वय 31 रा. झेंडीगेट) हा गोमांस विक्री करताना मिळून आला.

पोलिसांनी 55 किलो गोमांस, एक लोखंडी सत्तुर असा नऊ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. कुरेशी विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार रोहकले यांनी फिर्याद दिली आहे.