file photo

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :-  नाम्बिया देशा मध्ये रशियातील कोरोना लस स्पुटनिक व्ही च्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबत शनिवारी याची माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी नाम्बियाच्या शेजारचे राष्ट्र असलेल्या द. अफ्रिकेनेही स्पुटनिक व्ही च्या लसीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर आता नाम्बियात या लसीच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

स्पुटनिक व्ही लसीमुळे, पुरुषांना होण्याच्या शक्यतेत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे मानण्यात येते आहे. स्पुटनिक व्ही लस तयार करणाऱ्या जमेलिया रिसर्च इन्स्टिट्यूटने या निर्णयाविरोओधात नाराजी व्यक्त केली आहे.

नाम्बियाने घेतलेला निर्णय हा कोणत्याही वैज्ञानिक पुराव्यांविना किंवा संशोधन न करता घेण्यात आल्याचे इन्स्टिट्यूटचे म्हणणे आहे.

दक्षिण अफ्रिकेच्या नियामक बोर्डानेही देशात स्पुटनिक व्हीच्या आपत्कालीन वापराला परवागी नाकारलेली आहे. स्पुटनिक व्हीमध्ये एडेनोव्हायरस टाईप ५ वेक्टर असून,

यामुळे पुरुषांना एचआयव्ही होण्याची शक्यता वाढीस लागत असल्याचे, काही संशोधनात पुढे आल्याचा दावा नियामक बोर्डाने केला आहे.दक्षिण अफ्रिकेने व्यक्त केलेल्या चिंतेनंतर, या रशियन लशीवर बंदी घालण्याचा निर्णय नाम्बियानेही घेतला आहे.