अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- ड्रग्ज पार्टीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह तिघांना अटक केली. एनसीबीने तिघांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तिघांना 4 ऑक्टोबर पर्यंत कोठडी सुनावली आहे.

त्यामुळे या तिघांना आजची रात्र एनसीबीच्या कोठडीत काढावी लागणार आहे. एनसीबीच्या वकिलांनी या आरोपींची दोन दिवसांची कोठडी मागितली होती.

मात्र कोर्टानं या तीन आरोपींना एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. एनसीबी एक दिवसाच्या कोठडीत काय तपास करते, त्या तपासातून एनसीबीच्या हाती नेमकं काय लागतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ड्रग्ज प्रकरणाच्या लिंक कुठपर्यंत जातात ते आता तपासातून समोर येईल. शनिवारी रात्रू एनसीबीने गेट वे ऑफ इंडिया येथील समुद्रात क्रुझवर सुरू असलेली ड्रग्ज पार्टी उधळून लावली होती.

क्रुझवरील आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेऊन चौकशी केली, यानंतर आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मैत्रीण मुनमुन धोमेचा यांना अटक करण्यात आली आहे.

अटकेनंतर तिघांना वैद्यकीय चाचणीसाठी एनसीबीच्या मेडीकल ऑफिसमध्ये नेण्यात आले आहे. यावेळी कोणी कितीही बड्या बापाचा मुलगा असला तरी त्याच्यावर कारवाई होणारच, असेही एनसीबीने सांगितले.

अटक केलेल्यांची नावे….

1. आर्यन खान

2. अरबाज मर्चंट

3. मुनमुन धामेचा

4. नुपूर सारिका

5. इस्मित सिंह

6. मोहक जायसवाल

7. विक्रांत छोकर

8. गोमित चोपडा