Share Market News : जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूंक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आघाडीच्या 10 कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांचे बाजार भांडवल गेल्या आठवड्यात 2.12 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. या काळात सर्वात मोठी वाढ HDFC बँक आणि TCS च्या बाजार भांडवलात झाली.

गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स 844.68 अंकांनी म्हणजेच 1.38 टक्क्यांनी वाढला. बाजार भांडवलानुसार पहिल्या दहा कंपन्यांमध्ये या आठवड्यात फक्त हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) चे भांडवल कमी झाले आहे. त्याच वेळी, उर्वरित नऊ कंपन्यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या बाजार मूल्यांकनात एकूण 2,12,478.82 कोटी रुपयांची वाढ केली.

या कालावधीत, HDFC बँकेचे बाजार भांडवल सर्वाधिक 63,462.58 कोटी रुपयांनी वाढून 8,97,980.25 कोटी रुपये झाले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मूल्यांकनही 36,517.34 कोटी रुपयांनी वाढून 12,13,378.03 कोटी रुपयांवर पोहोचले.

HDFC चे बाजारमूल्य 29,422.52 कोटी रुपयांनी वाढून 4,81,818.83 कोटी रुपये झाले आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य 26,317.30 कोटी रुपयांनी वाढून 17,80,206.22 कोटी रुपये झाले.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख इन्फोसिसचे बाजार भांडवल 23,626.96 कोटी रुपयांनी वाढून 6,60,650.10 कोटी रुपये आणि अदानी एंटरप्रायझेसचे 20,103.92 कोटी रुपयांनी 4,56,992.25 कोटी रुपये झाले.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे मूल्यांकन 6,559.59 कोटी रुपयांनी वाढून 5,36,458.41 कोटी रुपये आणि भारती एअरटेलचे मूल्यांकन 5,591.05 कोटी रुपयांनी वाढून 4,59,773.28 कोटी रुपये झाले. ICICI बँकेचे बाजार भांडवल 877.56 कोटी रुपयांनी वाढून 6,32,192.05 कोटी रुपयांवर पोहोचले.

तथापि, हिंदुस्तान युनिलिव्हरचे बाजारमूल्य 3,912.07 कोटी रुपयांनी घसरून 5,88,220.17 कोटी रुपयांवर आले. बाजार भांडवलाच्या बाबतीत, रिलायन्स इंडस्ट्रीजने देशातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये पहिले स्थान कायम राखले आहे.

त्यापाठोपाठ टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी, भारती एअरटेल आणि अदानी एंटरप्रायझेस यांचा क्रमांक लागतो.