Share Market News : जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. कारण सरकारी माझगॉन डॉक शिपबिल्डर्सचे शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे.

Mazagon Dock Shipbuilders Ltd. चे शेअर्स गेल्या 5 महिन्यांत 250% पेक्षा जास्त वाढले आहेत. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 235 रुपयांवरून 850 रुपयांपर्यंत वाढले आहेत. Mazagon Dock Shipbuilders ही संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपनी युद्धनौका, पाणबुड्या आणि व्यापारी जहाजे बनवते.

1 लाख रुपये 3.69 लाख झाले

Mazagon Dock Shipbuilders Ltd. चे शेअर्स 20 जून 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 234.85 रुपये होते. 22 नोव्हेंबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 866.60 रुपयांवर बंद झाले.

जर एखाद्या व्यक्तीने 20 जून 2022 रोजी Mazagon Dock Shipbuilders च्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर हे पैसे सध्या 3.69 लाख रुपयांचे झाले असते.

या वर्षी स्टॉक्सने आतापर्यंत 206% परतावा दिला आहे

Mazagon Dock Shipbuilders Limited च्या समभागांनी या वर्षी आतापर्यंत गुंतवणूकदारांना 206% परतावा दिला आहे. वर्षाच्या सुरुवातीला, 3 जानेवारी 2022 रोजी, कंपनीचे शेअर्स BSE वर 283.60 रुपये होते.

Mazagon Dock Shipbuilders चे शेअर्स 22 नोव्हेंबर 2022 रोजी BSE वर Rs.866.60 वर बंद झाले. गेल्या एका वर्षात कंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांना सुमारे 213% परतावा दिला आहे.

Mazagon Dock Shipbuilders समभागांची 52 आठवड्यांची उच्च पातळी 887.90 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या समभागांची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 224 रुपये आहे.