file photo

Share Market Update : भारतीय शेअर बाजारामध्ये (Indian Share Market Update) आज चांगलाच चढ उतार पाहायला मिळाला आहे. बाजार सुरु होण्याच्या वेळी सेन्सेक्स (Sensex) चांगलाच वधारल्याचे पाहायला मिळाले मात्र बाजार बंद होण्याच्या वेळी सेन्सेक्स ५२ अंकांनी घसरला आहे. त्यामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली होती. 

आजच्या व्यवहारात फार्मा, मेटल, आयटी समभागात खरेदी झाली, तर एफएमसीजी, ऑटो समभागात किंचित वाढ दिसून आली. त्याचबरोबर बँकिंग, रिअॅल्टी, ऊर्जा शेअर्स वर दबाव होता.

व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स ५१.७३ अंकांनी म्हणजेच ०.०९ टक्क्यांनी घसरून ५८,२९८.८० वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) 6.15 अंकांनी किंवा 0.04 टक्क्यांनी घसरला आणि 17,382.00 वर बंद झाला.

बुधवारी हिरव्या चिन्हावर बाजार बंद होता

शेवटच्या सत्रात म्हणजेच बुधवारी व्यवहार संपल्यावर सेन्सेक्स २१४.१७ अंकांच्या किंवा ०.३७ टक्क्यांच्या वाढीसह ५८,३५०.५३ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 42.70 अंकांच्या किंवा 0.25 टक्क्यांच्या मजबूतीसह 17,388.15 च्या पातळीवर बंद झाला.

ऑगस्टमध्ये NSE आणि BSE सुट्ट्या

ऑगस्ट महिना सुट्टीसाठी खास असतो. या महिन्यात अनेक मोठे सण येतात. त्यामुळे या महिन्यातही शेअर बाजारात अनेक दिवस सुटी असणार आहे. ऑगस्ट 2022 मध्ये, BSE आणि NSE वरील ट्रेडिंग तीन दिवसांसाठी बंद राहील – 9 ऑगस्ट, 15 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट.

9 ऑगस्ट 2022 रोजी मोहरम असल्याने दलाल स्ट्रीटवर कोणतीही कारवाई होणार नाही. तसेच 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजारपेठ बंद राहणार आहे. महिनाअखेरीस ३१ ऑगस्टला येणाऱ्या गणेश चतुर्थीनिमित्त शेअर बाजार बंद राहील.

टायगर ग्लोबलने झोमॅटोमधील हिस्सा निम्म्याने कमी केला

हेज फंड कंपनी टायगर ग्लोबलने गुरुवारी सांगितले की त्यांनी झोमॅटोचे 180 दशलक्ष शेअर्स विकले आहेत. प्री-IPO गुंतवणूकदारांना 23 जुलैपर्यंत लागू असलेला एक वर्षाचा लॉक-इन कालावधी संपल्यानंतर एका आठवड्यात हे सौदे केले आहेत. टायगर ग्लोबल इन्व्हेस्टमेंट व्हेईकल इंटरनेट फंड IV कडे लॉक-इन कालावधीपूर्वी झोमॅटोमध्ये 5.11 टक्के हिस्सा होता.