file photo

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या कुटुंबियांसह देवदर्शनाला निघाली असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच शिल्पाने सहपरिवार शनिशिंगणापूर येथे येऊन शनी देवाचे दर्शन घेतले होते.

नुकतेच शिल्पाने राज कुंद्रासोबत एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत दोघेही शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेताना दिसत आहेत. नवीन वर्षात पती राज कुंद्रासोबत शिल्पा शेट्टीची ही पहिली पोस्ट आहे.

शिल्पाने शेअर केलेल्या व्हिडीओत दोघंही साईबाबांसमोर हात जोडून उभे असल्याचं दिसत आहे. व्हि़डीओ शेअर करताना शिल्पा शेट्टीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “सबका मालिक एक, श्रद्धा और सबुरी. ओम साई राम”.

दरम्यान पॉर्नोग्राफी प्रकरणात पती राज कुंद्राला अटक केल्यानंतर बसलेल्या मानसिक धक्क्यातून शिल्पा शेट्टीने स्वत:ला सावरलं असून पुन्हा एकदा आपल्या करिअरकडे लक्ष दिलं आहे.

पोलिसांनी राज कुंद्राला अटक केल्यानंतर शिल्पा शेट्टी घटस्फोटाच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यात सगळं काही आलबेल असल्याचं दिसत आहे. शिल्पा शेट्टीने नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये त्यांनी नव्याने आपल्या नात्याला सुरुवात केल्याचं दिसत आहे.