file photo

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  नगर येथील एका उपनगरातील एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी फरार असलेला शिवसेनेचा पदाधिकारी गोविंद मोकाटे याचा अटकपुर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळल्याने मोकाटे याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

नगर तालुक्यातील जेऊर येथील रहिवासी असलेल्या व सत्ताधारी शिवसेनेचा पदाधिकारी असलेल्या गोविंद मोकाटे याच्याविरुद्ध नगर मधील एका उपनगरातील महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान मोकाटे याच्या वतीने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीन ठेवण्यात आला होता.

शुक्रवारी (दि.७ जानेवारी) सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन अर्ज फेटाळण्यात आला असल्याची माहिती सरकारी वकील दिवाने यांनी दिली.

हा अर्ज फेटाळून लावल्याने मोकटे याच्या अडचणीत वाढ झाली आहे.