मुंबई : राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) भाजपकडून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व शिवसेनेला चांगलाच धक्का बसला आहे. शिवसेनेचे संजय शिंदे यांचा पराभव पक्षासाठी खूप दुर्दैवी ठरला आहे.

या पराभवानंतर भाजपकडून (Bjp) शिवसेनेला (Shivsena) डिवचण्याचे प्रयत्न चालू आहे. नुकतेच शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) यांनी माध्यमांसमोर संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना इशारा दिला आहे.

संभाजीराजे हे आमचे छत्रपती आहे. मात्र, शिवसेनेवरील टीका खपवून घेतली जाणार नाही. मराठा मावळा हरला असे पोस्टर लावणे अत्यंत दुर्दैवी आहे, असे संजय पवार म्हणाले आहेत.

संभाजीराजेंना इशारा देत संजय पवार म्हणाले की तुम्ही आमचे छत्रपती आहात. मात्र शिवसेनेवरील टीका खपवून घेतली जाणार नाही. मराठा मावळा हरल्याचे पोस्टर लावणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. शिवसेनेकडे मतं मागायला तुम्ही आला होता. शिवसेनेचे वाघ जंगलातील आहेत, सर्कशीतील नाही.

राज्यसभा निवडणुकीत कुठे दगाफटका झाला याचा शोध वरिष्ठ घेत आहेत, असेही संजय पवार म्हणाले. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करुन आधार दिला. इथून पुढे शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार काम सुरु ठेवणार, असेही संजय पवार यांनी सांगितले आहे.

दरम्यान, भाजपच्या धनंजय महाडिकांनी संजय पवारांचा पराभव केला आहे. तो पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याचा धागा पकडत मावळा हरल्याचे पोस्टर काही भागात लावण्यात आले होते. त्यावरुच आता संजय पवार यांनी असे पोस्टर्स लागणं दुर्दैवी असल्याचं म्हटले आहे.