अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  डॉक्टर व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांत अनेकदा शाब्दिक चकमक झालेल्या घटना घडल्या आहेत.(Ahmednagar Crime)

मात्र काल हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करत डॉक्टरला शिवीगाळ करून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना जामखेड तालुक्यात घडली आहे.

या प्रकरणी दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, काल सकाळी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास महेश परदेशी याचा अपघात झाल्याने त्याला जामखेड येथील पन्हाळकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

यावेळी हॉस्पिटलमधील ऑपरेश थिएटर सहाय्यक विनोद डोके यांनी सोबत असलेल्या दिपक चव्हाण व आनंद मोरे यांना एक्सरेची फि भरा व जखमीला डोळ्याच्या दवाखाण्यात घेवुन जा. असे म्हणाल्याचा राग आल्याने चव्हाण व मोरे या दोघांनी डोके व डॉ.पन्हाळकर यांना शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली.

तसेच तेथे असलेल्या पेशंट व त्यांच्या नातेवाईकांकडे पाहुन माझ्या विरूध्द कोणी तक्रार दिली तर, मी जिवे मारून टाकील. असे धमकवले.

दरम्यान पुन्हा पावणेआठच्या सुमारास दिपक चव्हाण हा त्याच्या (एमएच ०८ एसी ९३९४) या कारमधून लोखंडी राँड घेवुन हॉस्पिटलमध्ये शिवीगाळ करत आला व डोके यास जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर लोखंडी राँड मारला.

मात्र तो हल्ला हुकविला त्याने पुन्हा जोराने मारला परंतु तोही हल्ला हुकवला आणि जीव वाचवण्यासाठी हॉस्पिटलच्या एका रूममध्ये जाऊन लपून बसला.

त्यानंतर डॉक्टर व हॉस्पिटलाचा स्टाफ आल्याने दिपक चव्हाण याने तू आता वाचलास तु परत भेट तुला गोळया घालून ठार मारतो. अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी चव्हाण व मोरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.