अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  देशभरात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत शुक्रवारी 17 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोनाबाधितांची संख्या 20 हजारांच्या पुढे गेली आहे.

विशेष बाबा म्हणजे रुग्णानावर उपचार करणारे डॉकटर देखील आता कोरोनाच्या विळख्यात सापडू लागले आहे. आतापर्यंत तब्बल 3६४ डॉक्टर कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे.

महाराष्ट्र राज्यात कोरोनाची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मुंबई आणि पुणे या दोन महानगरांत मोठ्या प्रमाणत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत शुक्रवारी येथे 20971 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

तसेच, 8490 कोरोना रुग्ण बरे झाले तर 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील 123 हून अधिक इमारती सील मुंबईत पुन्हा एकदा कोरोना अगदी झपाट्याने वाढत आहे.

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील 123 हून अधिक इमारती सील करण्यात आल्या असून सध्या येथे 6 कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत.

दुसरीकडे, महाराष्ट्रात सुमारे 364 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यावर कडक निर्बंधांचे संकट घोंगावत आहे.