अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे बिबट्या आढळून आला होता. पांडवडगर तलावानजीक आजिनाथ दादासाहेब गिरगुणे यांच्या शेतात बिबट्या आढळून आला होता.(leopard news) 

बिबट्या दिसल्यानंतर शेतकऱ्यांनी ऊस पेटवून दिला होता. त्यानंतर बिबट्याने जवळच्या ऊसात पलायन केले. दरम्यान याच परिसरातून बिबट्याने एका शेतकऱ्याची मेंढी फस्त केली होती.

आज त्याच उसाच्या शेतात फस्त केलेल्या मेंढीचे अवशेष आढळून आले आहेत. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून पंचनामा केला आहे.

या परिसरात बिबट्याचे ठसे आढळून येत आहेत. त्यावरून ही मेंढी बिबट्याने फस्त केल्याचे दिसत आहे. त्यामुळे या भागात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे अधोरेखित होत आहे.

कुळधरण भागातील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा बसवून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी होऊ लागली आहे.