file photo

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- भारतातील तामीळनाडू या राज्याच्या वन विभागाने टी २३ हे सांकेतिक नाव दिलेल्या वाघाची शिकार करण्याचा आदेश दिला. टी २३ वाघाने आतापर्यंत चार नागरिकांना मारले.

वन विभाग मागील सहा दिवसांपासून या वाघाला पकडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पिंजरे लावून प्रयत्न करत आहे. अद्याप हा वाघ वन विभागाला आढळलेला नाही.

या वाघाला अखेरचे निलगिरी जिल्ह्यात बघितल्याची नोंद आहे . या वाघाने माणसांना मारल्यामुळे स्थानिकांकडून वन विभागावर प्रचंड दबाव आहे.

या दबावातून तामीळनाडूच्या वन विभागाने टी २३ हे सांकेतिक नाव दिलेल्या वाघाची शिकार करण्याचा आदेश दिला. वन विभागाच्या ७५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा टी २३ वाघाला पकडण्यासाठी पाच टीम करुन प्रयत्न करत आहे.

वाघाला पकडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. पण या प्रयत्नांना यश आलेले नाही.

शिकारीचा आदेश दिला तरी वाघाला पकडण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न थांबवणार नाही; असे वन विभागाने जाहीर केले.